सो कॉल्ड पप्पूला घाबरले! Swara Bhasker चा भाजपवर हल्लाबोल…

  • Written By: Published:
सो कॉल्ड पप्पूला घाबरले! Swara Bhasker चा भाजपवर हल्लाबोल…

नवी दिल्ली : जाहीर भाषणातून ‘सगळे मोदी चोर का असतात’, असे वक्तव्य करणाऱ्या काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय लोकसभा अध्यक्षांनी दिला. तसेच दोनच दिवसांपूर्वी याचप्रकरणी गुजरात न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. यावरून आता बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी भाजपवर हल्लाबोल करत ‘सो कॉल्ड पप्पूला घाबरले’ म्हणून खिल्ली उडवली आहे.

लोकसभा अध्यक्षांनी शुक्रवारी (दि.२३) रोजी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. यावरून अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी तथाकथित लोकं राहुल गांधी यांना किती घाबरले आहेत, हेच समोर येत आहे. भाजपने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करून कायद्याच्या घोर अपमान केला आहे.

राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय द्वेष भावनेतून, प्रकाश आंबेडकरांची टीका – Letsupp

राहुल गांधी यांची वाढती लोकप्रियता, विश्वासार्हता वाढत असल्याने त्यांची लोकप्रियता कमी करण्यासाठी तथाकथित लोकांनी कायद्याचा दुरुपयोग सुरू केला आहे. राहुल गांधी यांना येणारी २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवता येऊ नये यासाठी अत्यंत खालच्या पातळीवर भाजप उतरली आहे, असा आरोप अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी केला आहे.

स्वरा भास्कर म्हणतात की, भाजपने कितीही विरोधी पक्षातील खासदारांना त्रास दिला. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली म्हणजे त्यांची लोकप्रियता कमी करता येईल, असे भाजपला वाटत असेल तर ते चुकीचे ठरणार आहे. कारण अशा कायदा विरोधी कृती केल्यामुळे उलट राहुल गांधी यांची लोकप्रियता आणखी वाढणार आहे, असा मला ठाम विश्वास आहे.

(220) Sushma Andhare : सुषमा अंधारे यांची स्फोटक मुलाखत | LetsUpp Marathi – YouTube

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube