टीम इंडिया टी20 वर्ल्डकपसाठी नव्या जर्सीचं अनावरण, ‘हे’ दोन बदल होणार

टीम इंडिया टी20 वर्ल्डकपसाठी नव्या जर्सीचं अनावरण, ‘हे’ दोन बदल होणार

T20 New Jersey : सध्या आयपीएल 2024 स्पर्धा सुरू आहे. आता टी20 वर्ल्डकप स्पर्धेचे सर्वांना वेध लागले आहेत. यामध्ये सुमारे 11 वर्षांपासून भारतीय संघाने एकही आयसीसी चषक जिंकलेला नाही. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात शेवटचा आयसीसी चषक 2013 मध्ये जिंकला होता. त्यानंतर आतापर्यंत भारतीय संघाने आयसीसी चषक जिंकलेला नाही.

 

नव्या जर्सीसह फोटो शूट

ही संधी 2023 मध्ये ही चालून आली होती. मात्र अंतिम फेरीत पराभवाचं तोंड पाहावं लागलं. आता पुन्हा एकदा टीम इंडिया टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी सज्ज आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडियाच्या नव्या जर्सीचं अनावरण करण्यात आलं आहे. बीसीसीआयने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून याबाबतची माहितीही दिली आहे. इंडिया टिमचा कॅप्टन रोहित शर्मा नव्या जर्सीसह फोटो शूट करत आहे. त्याच्यासोबत बीसीसीआय सचिव जय शाह आहेत.

 

समोरच्या भागात देशाचं नाव

सध्या लाँच झालेल्या जर्सीत दोन बदल करावे लागणार आहेत. टीम इंडियाच्या जर्सीवर स्पॉन्सर ड्रीम इलेव्हन आहे. हे नाव जर्सीच्या मधोमध लिहिलं आहे. तसंच किट स्पॉन्सर एडिडासचाही लोगो आहे. नियमानुसार आयसीसी स्पर्धेत जर्सीच्या समोरच्या भागात देशाचं नाव लिहावं लागतं. त्याचबरोबर आयसीसीचा लोगोही असतो. यासाठी टीम इंडियाच्या नव्या जर्सीवर स्पॉन्सर ड्रीम इलेव्हन आणि एडिडासचा लोगो इतरत्र प्रिंट करावा लागेल. आताची जर्सी भारतीय संघ टी20 मालिकांमध्ये परिधान असणार आहे.

 

8 फेरीचे सामने वेस्ट इंडिजमध्ये

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना 5 जूनला होणार आहे. आयर्लंड संघासोबत भारताची लढत असेल. त्यानंतर 9 जून रोजी पाकिस्तानसोबत हायव्होल्टेज सामना असेल. 12 जूनला अमेरिका आणि 15 जूनला कॅनडा समोर असेल. हे सर्व सामने अमेरिकेत होणार आहेत. दुसरीकडे सुपर 8 फेरीचे सामने वेस्ट इंडिजमध्ये होतील. टी20 वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम सामना 29 जूनला होणार आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर टीम इंडिया झिम्बाब्वेविरुद्ध पाच सामन्याची टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेत सध्याची जर्सी परिधान करून टीम इंडिया उतरेल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube