टेक महिंद्राचे वरिष्ठ कर्मचारी तीन महिन्यांपासून कतारच्या ताब्यात; कोण आहेत ते अन् का आहेत ताब्यात?

टेक महिंद्राचे वरिष्ठ कर्मचारी तीन महिन्यांपासून कतारच्या ताब्यात; कोण आहेत ते अन् का आहेत ताब्यात?

Amit Gupta : कंपनी टेक महिंद्रा कंपनीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. (Amit Gupta ) भारतीय आयटी क्षेत्रातील ही प्रमुख कंपनी आहे. येथील वरिष्ठ कर्मचारी अमित गुप्ता गेल्या तीन महिन्यांपासून कतारमध्ये ताब्यात असल्याची ही घटना आहे. जानेवारी 2025 पासून त्यांच्यावर डेटा चोरीच्या आरोपाखाली चौकशी सुरू असून, यासंबंधी अधिकृत तपशील उघड झालेला नाही. मात्र, गुप्तांच्या कुटुंबियांनी हे आरोप फेटाळत त्यांना परत आणण्याची मागणी केली आहे.

कोण आहेत अमित गुप्ता ?

अमित गुप्ता यांना टेक महिंद्रामध्ये त्यांना 12 वर्षांचा अनुभव आहे. सीनियर सेल्स मॅनेजर आणि क्लायंट पार्टनर म्हणूनही त्यांनी काम केलं. याआधी न्युक्लियस सॉफ्टवेअर एक्सपोर्ट्समध्ये ते तीन वर्षे कार्यरत होते. इन्फोसिसमध्ये सहाय्यक व्यवस्थापक म्हणून त्यांना अनुभव आहे. अमित गुप्ता हे टेक महिंद्रामध्ये कतार आणि कुवेतसाठी प्रादेशिक प्रमुख म्हणून कार्यरत होते. गेल्या तीन वर्षांपासून ते या पदावर होते आणि या प्रदेशातील व्यवसायवृद्धीचे नेतृत्व करत होते.

शैक्षणिक पार्श्वभूमी

टेक महिंद्राने या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सांगितलं की, ते गुप्तांच्या कुटुंबीयांशी नियमित संपर्कात आहेत आणि त्यांना आवश्यक ती मदत देत आहेत. आम्ही भारतीय आणि कतारच्या अधिकाऱ्यांसोबत समन्वय साधत आहोत आणि सर्व कायदेशीर प्रक्रियांचे पालन करत आहोत, असंही टेक महिंद्राकडून स्पष्ट करण्यात आल आहे. त्याचबरोबर भारतीय परराष्ट्र मंत्रालयानेही या प्रकरणाची दखल घेतली असून, कतारमधील भारतीय दूतावासामार्फत सर्वतोपरी मदत केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

वाढते कारवाईचे प्रकार

हा पहिलाच प्रसंग नाही जेव्हा कतारमध्ये भारतीयांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. याआधी 2022 मध्ये आठ माजी भारतीय नौदल अधिकारी कतारमध्ये अटक करण्यात आले होते. त्यांना 2023 मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, भारतीय सरकारच्या प्रयत्नांमुळे त्यांची शिक्षा माफ करण्यात आली फेब्रुवारी 2024 मध्ये ते मायदेशी परतले. अमित गुप्तांच्या प्रकरणात अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यांच्या कुटुंबाने सरकारकडे अधिक मदतीची मागणी केली आहे. गुप्तांच्या आईने माध्यमांशी बोलताना सांगितले की, अजूनही कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या