Chandrababu Naidu Arrest : आंध्र प्रदेशात वातावरण पेटलं! चंद्राबाबू नायडूंच्या समर्थनात दगडफेक, जाळपोळ; कलम 144 लागू
Chandrababu Naidu Arrest : कौशल्या विकास योजनेतील कथित 300 ते 400 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या अटकेचे पडसाद उमटू लागले आहेत. या प्रकरणी नायडू यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून टीडीपीच्या कार्यकर्त्यांकडून राडा घालण्यात आला आहे. राज्यात दगडफेकसह, जाळपोळच्या घटना घडल्याचं समोर आलं आहे.
#WATCH | Chittoor, Andhra Pradesh: TDP workers hold protest against the arrest and judicial custody of former Andhra Pradesh CM and TDP Chief N Chandrababu Naidu.
Former CM N Chandrababu Naidu was sent to judicial custody till September 23 in a corruption case yesterday. pic.twitter.com/o19O36w5JQ
— ANI (@ANI) September 11, 2023
चंद्राबाबू नायडू यांची रविवारी रात्री 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून या घटनेमुळे संतप्त झालेल्या जीडीपीच्या कार्यकर्त्यांनी चित्तूरमधील राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवर दगडफेक केली असून राज्यातील अनेक भागांत जाळपोळीच्या घटना घडल्या आहे. राज्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून कलम 144 लागू करण्यात आला आहे.
या घटनेनंतर राज्यभरात टीडीपीच्या कार्यकर्त्यांकडून बंदची हाक देण्यात आली असून दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनांमुळे पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड सुरु करण्यात आली आहे. या घटनेमुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून पोलिसांकडून उपाययोजना करण्यात येत आहे.
उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का, बबनराव घोलपांचा उपनेतेपेदाचा राजीनामा
नायडूंच्या अटकेनंतर आंध्रप्रदेशातील सत्ताधारी जगनमोहन रेड्डी सरकारविरोधात नायडूंच्या समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजीसह रास्ता रोको, टायर जाळून निषेध, आंदोलन करण्यात येत आहे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी पोलिसांकडून आंदोलकांनाही अटक करण्यात येत आहे.
https://www.youtube.com/watch?v=7DOsNyIkNfE&t=1103s
दरम्यान, चंद्राबाबू नायडू यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर राज्याभरातील जीडीपी कार्यकर्त्यांमध्ये भडका उडाल्याचं दिसून आलं. त्यामुळे पोलिसांनी नायडू यांना पोलिस बंदोबस्तात राजाहमुड्रे सेंट्रल जेलमध्ये नेण्यात आलं असून नायडू 23 सप्टेंबरपर्यंत कोठडीत असणार आहेत.