काँग्रेसमधील अन् बाहेरील काही जणांचा आनंद पण…, पश्चिम बंगाल निकालावर राहुल गांधी काय म्हणाले?

आसाम आणि बंगालमधील जनादेशाची चोरी हे भारतीय लोकशाही नष्ट करण्याच्या भाजपाच्या मोहिमेतील पुढचे पाऊल आहे.

News Photo   2026 05 05T153247.492

भाजपाने बंगालमध्ये मिळवलेल्या मोठ्या विजयानंतर(Congress) काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काँग्रेसमधील आणि इतर पक्षांच्या नेत्यांवर कडक शब्दांत टीका केली आहे. तृणमूल काँग्रेसची (TMC) चेष्टा करणाऱ्या किंवा त्यांच्यावर टीका करणाऱ्या आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पराभवावर आनंद साजरा करणाऱ्यांना त्यांनी खडेबोल सुनावले.

राहुल गांधी म्हणाले की, विरोधी पक्षांचा हा पराभव म्हणजे भारताची लोकशाही नष्ट करण्याच्या भाजपाच्या मोहिमेतील एक ‘मोठे पाऊल’ आहे. काँग्रेसमधील काही लोक आणि इतरही तृणमूलच्या पराभवावर आनंद साजरा करत आहेत. त्यांनी हे स्पष्टपणे समजून घेणे आवश्यक आहे की, आसाम आणि बंगालमधील जनादेशाची चोरी हे भारतीय लोकशाही नष्ट करण्याच्या भाजपाच्या मोहिमेतील पुढचे पाऊल आहे.

1998 ची ती एक जागा आज 207 वर 29 वर्षांपूर्वीच ममतांनी स्वतःच रचली होती राजकीय अंताची स्क्रिप्ट

क्षुद्र राजकारण बाजूला ठेवा. ही लढाई एका पक्षाची किंवा दुसऱ्याची नाही, तर ही भारतासाठीची लढाई आहे. गेल्या २४ तासांत राहुल गांधी यांनी दुसऱ्यांदा ममता बॅनर्जी यांची पाठराखण केली आहे. सोमवारीही त्यांनी म्हटले होते की, आम्ही ममताजींच्या मताशी सहमत आहोत. बंगालमध्ये १०० हून अधिक जागा चोरल्या गेल्या आहेत.

प्रियंका चतुर्वेदी यांचीही टीका

शिवसेना (UBT) खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही या प्रकाराला लाजीरवाणे म्हटले आहे. त्यांनी ‘X’ वर पोस्ट करत म्हटले की, इंडिया (INDIA) आघाडीमधील अंतर्गत घटक पक्षांकडूनच TMC आणि DMK च्या अपयशावर ज्या प्रकारे आनंद व्यक्त केला जात आहे, ते पाहणे क्लेशदायक आहे.

अरविंद केजरीवाल, तेजस्वी यादव यांचा पराभव झाला आणि आप (AAP) मध्ये फूट पडली, तेव्हाही अशीच शेखी मिरवताना काही लोक दिसले होते. आता आगामी उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी ते अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधत आहेत. हीच फूट मतदार नाकारतात आणि भाजप याचाच फायदा घेते.

follow us