आर्थिक वर्ष सुरु होण्यापूर्वीच सरकारी कर्मचाऱ्यांना खूशखबर; महागाई भत्त्यामध्ये वाढ; किती डीए मिळणार?

आर्थिक वर्ष सुरु होण्यापूर्वीच सरकारी कर्मचाऱ्यांना खूशखबर; महागाई भत्त्यामध्ये वाढ; किती डीए मिळणार?

Government Employees : मोदी सरकारने आर्थिक वर्ष सुरु होण्यापूर्वीच (Employees ) केंद्रीय कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी दिली. केंद्र सरकारने काल महागाई भत्त्यामध्ये २ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता महागाई भत्ता ५३ टक्क्यांवरुन ५५ टक्के इतका होईल.

हा भत्ता सरकारी कर्मचाऱ्यांना वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी दिला जातो. मूळ वेतनासाठी प्रत्येक दहा वर्षाला आयोग नेमला जातो. परंतु डीए प्रत्येक सहा महिन्याला बदलतो. मागच्या वर्षी १२ जुलै २०२४ रोजी डीए ५० टक्क्यांवरुन ५३ टक्के करण्यात आलेला होता.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ

सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनवेळा महागाई भत्त्यामध्ये वाढ मिळते. वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात आणि जुलै महिन्यात भत्ता वाढतो. याची घोषणा उशिरा होऊ शकते. परंतु, डीएचा मोबदला जानेवारी आणि डिसेंबरच्या AICPI-IW (महागाई आकडे) आधारे दिला जातो.

केंद्रीय कॅबिनेट बैठकीत डीएबाबात घेतलेला निर्णय केवळ केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू असतो. त्यानंतर राज्य सरकारं आपापल्या पद्धतीने डीए वाढवतात. परंतु, राज्याचा निर्णय वेगवेगळ्या वेळेला होतो. AICPI-IW हा महागाई भत्त्याचा निकष आहे. ज्याच्या आधारावर डीए ठरवला जातो.

डीए वाढल्यानंतर किती पैसे मिळतात?

एखाद्या कर्मचाऱ्याचं बेहा भत्ता सरकारी कर्मचाऱ्यांना वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी दिला जातो. मूळ वेतनासाठीसिक वेतन ५० हजार रुपये असेल तर ५३ टक्के डीएच्या हिशोबाने त्याला २६ हजार ५०० रुपये इतका डीए मिळत होता. आता यात आणखी २ टक्के वाढ झाल्यानंतर डीए ५५ टक्के झाला आहे. त्यामुळे आता ५० हजार वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्याला २७५०० रुपये प्रति महिना महागाई भत्ता मिळणार आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube