Tur Import : शुल्कमुक्त तूर आयातीला पुन्हा एक वर्षाची मुदतवाढ; केंद्र सरकारचा निर्णय…

केंद्र सरकारकडून कडधान्यांच्या आयातीच्या धोरणात 2027 पर्यंत वाढ करण्यात आली असून तूर, उडीद दाळीवरील आयात शुल्कमुक्त करण्यात आलीयं.

Untitle (9)

Tur Import : देशात कडधान्यांची आयात-निर्यातीमध्ये सुसुत्रता आणण्यासाठी केंद्र सरकारने आयातीचं धोरण 31 मार्च 2027 पर्यंत वाढवलं असून तूर आणि उडीदाच्या आयात पूर्णपणे शुल्कमुक्त (Tur Import Export) राहणार आहे. तर कापसावर 30 टक्के आयात शुल्क लागू असणार आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे डाळींच्या बाजारपेठेला दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे. व्यापाऱ्यांच्या मते, आयात धोरणाला एक वर्षाची मुदतवाढ मिळाल्याने उद्योगाला दीर्घकालीन स्पष्टता मिळेल, ज्यामुळे आयातदार, प्रक्रिया करणारे आणि घाऊक विक्रेत्यांना त्यांच्या खरेदी आणि पुरवठा धोरणांचे अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करता येईल.

अमोल खताळांच्या अडचणीत वाढ, आमदारकी रद्द होणार? थोरातांची याचिका न्यायालयाने स्वीकारली

तज्ज्ञांच्या मते, तूर आणि उडीद यांची देशांतर्गत मागणी मजबूत आहे, परंतु हवामान, पेरणी क्षेत्र आणि उत्पादनातील चढउतारामुळे देशांतर्गत पुरवठ्यावर अनेकदा परिणाम होतो. शुल्कमुक्त आयातीमुळे देशांतर्गत बाजारात उपलब्धता वाढेल आणि किरकोळ किमतींवरील दबाव कमी होईल. यामुळे ग्राहकांना महागाईपासून दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

पिवळ्या वाटाण्यावरील ३० टक्के शुल्क कायम ठेवण्याचा निर्णय देशांतर्गत शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन घेण्यात आला असल्याचे मानले जाते. वाढलेल्या आयातीमुळे स्थानिक बाजारातील भाव कमकुवत होऊ शकले असते, त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा यासाठी सरकारने हा समतोल राखला आहे.

बापासाठी लेक झाली ‘देवदूत’; आमदार विजय शिवतारे यांना मुलगी ‘ममता’ने दिली किडनी

दरम्यान, व्यापार सूत्रांच्या अंदाजानुसार, 2026-27 हंगामात भारताची एकूण कडधान्यांची आयात 50 लाख टनांपेक्षा जास्त होऊ शकते. कॅनडा, रशिया, म्यानमार आणि मोझांबिकसारख्या देशांमधून मोठ्या प्रमाणात तूर, उडीद आणि पिवळे वाटाणे येण्याची अपेक्षा आहे.

follow us