H3N2 व्हायरसचे संकट मार्च अखेरीस कमी होईल, केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

  • Written By: Published:
H3N2 व्हायरसचे संकट मार्च अखेरीस कमी होईल, केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

कोरोनानंतर देशात आता H3N2 व्हायरसचे संकट समोर दिसत आहे.यामुळे देशात आतापर्यंत दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मीडिया रिपोर्टनुसार आतापर्यंत जे दोन मृत्यू झाले, त्यात कर्नाटकात एक मृत्यू नोंदवला गेला, तर दुसरा मृत्यू हरियाणामध्ये झाला. तर देशात आतापर्यंत H3N2 इन्फ्लूएंझाची एकूण 90 आणि H1N1 ची आठ प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

हेही वाचा : कोरोनानंतर घातक H3N2 विषाणूचा उद्रेक; देशात दोघांचा मृत्यू

यावर आता केंद्र सरकारकडून देखील स्पष्टीकरण देण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय एकात्मिक रोग देखरेख कार्यक्रम (IDSP) नेटवर्कद्वारे विविध राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील हंगामी इन्फ्लूएंझा परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. मंत्रालयातून लागण आणि मृत्युदराचा आढावा घेतला जात आहे.

केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार सीझनल इन्फ्लूएन्झा हा इन्फ्लूएंझा विषाणूंमुळे होणारा तीव्र श्वसन संसर्ग आहे जो जगाच्या सर्व भागांमध्ये पसरतो आणि जागतिक स्तरावर काही महिन्यांमध्ये या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. भारतात दरवर्षी हंगामी इन्फ्लूएंझाच्या साथीत दोनदा वाढ होते. एक जानेवारी ते मार्च आणि दुसरा मान्सून नंतरच्या हंगामात. हंगामी इन्फ्लूएंझामुळे उद्भवलेल्या प्रकरणांमध्ये मार्चच्या शेवटी घट होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याच्या या आव्हानाला तोंड देण्यासाठी राज्य पाळत ठेवणारे अधिकारी पूर्णपणे सज्ज आहेत.

भारतामध्ये लागण होत असलेल्या रुग्णांमध्ये हे दोन प्रकारचे इन्फ्लूएंझा विषाणू आढळून आले आहेत. मार्चच्या सुरुवातीलाच इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या तज्ज्ञांनी सांगितले होते की, भारतात गेल्या दोन-तीन महिन्यांपासून सततचा खोकला आणि खोकल्याचे कारण हे इन्फ्लुएंझा ‘ए’ व्हायरसचा ‘H3N2’ हा उपप्रकार आहे. आहे. ICMR शास्त्रज्ञांनी सांगितले की, H3N2, जो गेल्या दोन-तीन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर पसरला आहे, हे इतर उपप्रकारांच्या तुलनेत रूग्णांच्या हॉस्पिटलायझेशनचे एक प्रमुख कारण आहे.

दरम्यान इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने देशभरात खोकला, सर्दी आणि मळमळण्याच्या वाढत्या प्रकरणांमध्ये अँटिबायोटिक्सच्या अतिवापराविरूद्ध सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा ताप पाच ते सात दिवस राहू शकतो पण खोकला तीन आठवडे टिकू शकतो.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube