प्रचारावर हजारो कोटींचा खर्च, औषधांसाठी पैसे नाहीत? नांदेड दुर्घटनेवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल

प्रचारावर हजारो कोटींचा खर्च, औषधांसाठी पैसे नाहीत? नांदेड दुर्घटनेवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल

Nanded Hospital Death : नांदेडमध्ये शासकीय रुग्णालयात गेल्या 24 तासांत 12 नवजात बालकांसह 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे (Shankarao Chavan Government Medical College) डीन यांनी सांगितले की,रुग्णालयातील मृत्यू मागे औषधे आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. त्यामुळे गेल्या 24 तासांत झालेल्या 24 मृत्यूंपैकी 12 मृत्यू विविध आजारांमुळे झाले असून सर्वाधिक मृत्यू हे सर्पदंशामुळे झाले आहेत.

डीन डॉ. श्यामराव वाकोडे यांनी सांगितले की, गेल्या 24 तासांत सहा मुलं आणि सहा मुलींचा मृत्यू झाला आहे. 12 किशोरांनीही आपला जीव गमवला आहे. कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमुळे अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, येथे लांबून रुग्ण येतात. काही दिवसांपासून येथे रुग्णांची संख्या वाढल्याने बजेटचा प्रश्न निर्माण झाला आहे. डीनने सांगितले की तिथे एक हाफकाईन इन्स्टिट्यूट आहे. त्यांच्याकडून औषधे घ्यायची होती पण ती होऊ शकली नाही. मात्र आम्ही स्थानिक पातळीवर औषध खरेदी करून रुग्णांना दिले.

राहुल गांधींनी दुख: व्यक्त करत भाजपवर निशाणा साधला
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर लिहिले की, ते (भाजप) आपल्या प्रचारावर हजारो कोटी रुपये खर्च करतात, पण मुलांच्या औषधांसाठी पैसे नाहीत? भाजपच्या नजरेत गरिबांच्या जीवाला किंमत नाही.

ठाण्यात काय घडलं होतं?
ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चार दिवसांत 27 जणांचा मृत्यू झाला होता. उपाचारांआभावी आणि सुविधांआभावी हे मृत्यू झाल्याचे आरोप नातेवाईकांनी आणि विरोधकांनी केले होते. त्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांंना विरोधकांनी त्यांना घेरले होते. त्यावेळी उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात आलेल्या रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण अत्यावस्थ किंवा वृद्ध होते, त्यामुळे ते उपचारांना प्रतिसाद देऊ शकले नव्हते, असा दावा, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube