पन्नूने आठवड्याभरातच धमकी खरी ठरवली? देशाच्या संसदेवर ‘गॅस’ अ‍ॅटॅक?

पन्नूने आठवड्याभरातच धमकी खरी ठरवली? देशाच्या संसदेवर ‘गॅस’ अ‍ॅटॅक?

नवी दिल्ली : देशाच्या संसदेच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचे समोर आले आहे. लोकसभेच्या कामकाजावेळी तीन अज्ञात व्यक्ती सभागृहात घुसल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तीन व्यक्ती प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात शिरले आणि त्यातील दोघे लोकसभेतील बाकांवर इकडून तिकडे पळत होते. मिळालेल्या माहितीनुसार, यातील एकाने बुटातून काही तरी गॅस काढला आणि तो लोकसभेत स्प्रे केला. यामुळे उपस्थित खासदारांच्या नाकात जळजळ सुरु झाली. दरम्यान, या घटनेने लोकसभेत एकच खळबळ उडाली असून या तिन्ही व्यक्तींना सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतले आहे. ते कोण आहेत त्यांच्याकडे पास होते का? याची कसून चौकशी केली जात आहे. (The visitor, who jumped into LS chamber from gallery, was seen leaping over benches)

खासदार अरविंद सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभेत शून्य प्रहाराचे कामकाज सुरु होते. अचानक प्रेक्षक गॅलरीतून तिघे जण खांबाला धरुन लटकले. त्यातील दोन जणांनी खाली उडी घेतली आणि ते लोकसभेतील बाकांवर इकडून तिकडे पळत होते. त्याचवेळी तिसऱ्या व्यक्तीने बुटातून काही तरी गॅसचा फवारा केला. यामुळे उपस्थित खासदारांच्या नाकात आणि डोळ्यात जळजळ सुरु झाली. त्यानंतर सभागृह तहकूब झाले. सुरक्षा रक्षकांनी या तिघांनाही ताब्यात घेतले असून ते जे काही पुढील कारवाई असेल ते करत आहेत. पण या तिघांनी कोणत्याही घोषणा दिल्या नाहीत किंवा आरडाओरड केली नाही. त्यामुळे ते नेमके कशासाठी आले होते याचा अंदाज लागू शकलेला नाही, असेही सावंत म्हणाले.

संसदेच्या सुरक्षेत मोठी चूक; कामकाजावेळी तीन अज्ञात व्यक्ती सभागृहात घुसल्याने खळबळ

पन्नुने धमकी खरी ठरवली?

खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंतसिंह पन्नू याने याने सहा डिसेंबर रोजी एका व्हिडीओच्या माध्यमातून  13 डिसेंबर किंवा त्याआधी भारताची संसद हादरून जाईल, अशी धमकी दिली होती. भारतीय यंत्रणांनी मला मारण्याचा कट रचला पण त्यात ते यशस्वी झाले नाहीत. आता 13 डिसेंबर किंवा त्याआधी संसदेवर हल्ला करून याचे उत्तर दिले जाईल, असे तो म्हणाला होता. त्यानंतर आज संसदेत तीन अज्ञात व्यक्ती घुसल्याने आणि त्यांनी गॅस सारखा पदार्थ स्पे केल्याने हा संसदेवर झालेला गॅस हल्ला आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.

‘चौहान राज’ : मध्यप्रदेशमध्ये संपले पण भाजपमध्ये सुरु झाले!

21 वर्षांपूर्वीच्या आठवणी पुन्हा ताज्या :

विशेष म्हणजे आजच्याच दिवशी 21 वर्षांपूर्वी म्हणजे 2001 साली संसदेवर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. AK47 रायफल, ग्रेनेड लाँचर, पिस्तूल आणि ग्रेनेड अशा मोठ्या शस्त्रसाठ्यासह पाकिस्तानच्या लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदचे पाच दहशतवादी गृह मंत्रालय आणि संसदेचे बनावट स्टिकर्स घालून आत घुसले. या हल्ल्यात देशाचे 9 शूर जवान शहीद झाले होते. तर हा हल्ला करणारे पाचही दहशतवादी मारले गेले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube