अखेर रेल्वे प्रशासनाला जाग, आता देशभरातील सिग्नलिंग यंत्रणेचे ऑडिट करण्याचा घेतला निर्णय

अखेर रेल्वे प्रशासनाला जाग, आता देशभरातील सिग्नलिंग यंत्रणेचे ऑडिट करण्याचा घेतला निर्णय

Audit of signaling system : ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातात (Balasore train accident) अनेकांना आपल्या प्राणांना मुकावे लागले असून अनेकजण जखमी झाले आहेत. त्यानंतर रेल्वे मंत्रालयाने (Ministry of Railways) या अपघाताची सीबीआय (CBI) चौकशी करण्याची शिफारस केली. आणि आता देशभरातील सिग्नलिंग यंत्रणेचे ऑडिट (Audit of signaling system) करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. (There will be an audit of the signal system across the country)

रेल्वे बोर्डाने सर्व महाव्यवस्थापकांना 14 जूनपर्यंत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. जेव्हा संपूर्ण भारत चाचणी केली जाईल, तेव्हा यंत्रणा योग्यरित्या कार्य करत आहे याची खात्री करण्यासाठी 10 टक्के ठिकाणांची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पुन्हा चाचणी केली जाईल. याशिवाय, रेल्वे स्थानकांवर बसवण्यात आलेल्या हाऊसिंग सिग्नलिंग उपकरणांची चौकशी करण्यात यावी, असे आदेशात म्हटले आहे.

राऊतांवर टीका करतांना गुलाबराव पाटलांची जीभ घसरली, एकेरी उल्लेख करत बाप काढला

रेल्वे मंत्रालयाच्या आदेशात असेही म्हटले आहे की, सिग्नलिंग सिस्टीम रिले रूममधूनच नियंत्रित केली जाते.
मात्र, रिले रूमची तपासणी केल्यानंतर दुहेरी सिग्नलिंग यंत्रणा योग्य प्रकारे काम करत आहे की नाही हे निश्चित केली जाईल.

बालासोर येथे शुक्रवारी झालेल्या अपघातात 250 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि 1,000 हून अधिक प्रवासी जखमी झाले. या रेल्वे दुर्घटनेत कोणता कर्मचारी दोषी आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. ट्रेनच्या लोकेशनची माहिती देणाऱ्या इंटरलॉकिंग सिस्टीममध्ये छेडछाड झाली असावी, अशी भीती शक्यता रेल्वे मंत्रालयाने व्यक्त केली आहे. त्यामुळं रेल्वे विभागाने या अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केली.

त्यानंतर सर्व झोनच्या महाव्यवस्थापकांना लिहिलेल्या पत्रात, रेल्वे बोर्डाने निर्देश दिले आहेत की स्थानक हद्दीतील सिग्नलिंग उपकरणांच्या सर्व घुमटांवर विशेष लक्ष देऊन सुरक्षा मोहीम त्वरित सुरू करावी. शिवाय, दुहेरी लॉकिंग सिस्टीम आहे की नाही याची तपासणी करून खात्री करावी, असे बोर्डाने म्हटले आहे.

स्थानकांच्या सर्व रिले रूम्स तपासल्या जाव्यात, या रिले रूमचे दरवाजे उघडण्यासाठी/बंद करण्यासाठी डेटा लॉगिंग आणि एसएमएस अलर्ट तयार केले जात आहेत याचीही खात्री करावी, असे बोर्डाने म्हटले आहे. सिग्नलिंग आणि टेलिकम्युनिकेशन उपकरणांसाठी डिस्कनेक्शन आणि रीकनेक्शनची प्रणाली निर्धारित नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांनुसार काटेकोरपणे पाळली जात आहे की नाही हे तपासण्याचे निर्देश रेल्वे बोर्डाने दिले आहेत.

दरम्यान, सोमवारी रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी अपघातातील जखमी चालक आणि त्याच्या सहाय्यकाचे जबाब नोंदवले. दोघांवर एम्स-भुवनेश्वरमध्ये उपचार सुरू आहेत. या अपघाताप्रकरणी रेल्वे कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मृत्यू झालेल्यांपैकी 170 जणांची ओळख पटली आहे.

दोन्ही रुळांवर पुन्हा गाड्या धावू लागल्या

अपघातानंतर आता गाड्या पुन्हा रुळावरून धावू लागल्या आहेत. सोमवारी, वरच्या ट्रॅकवर म्हणजेच कोरोमंडल ट्रेनचा अपघात झाला त्या मार्गावर 80 टक्क्यांपर्यंत गाड्यांची वाहतूक सुरू झाली आहे. मालगाडी ज्या दुस-या डाऊन ट्रॅकवर उभी होती, तिथून ७० टक्के गाड्या जाऊ लागल्या. मदतकार्य पूर्ण झाल्यानंतर एनडीआरएफच्या सर्व 9 तुकड्याही परतल्या आहेत. वंदे भारतही अपघातग्रस्त ट्रॅकवरून गेली आहे.

बारगढमध्ये मालगाडी रुळावरून घसरली

बालासोर दुर्घटनेच्या तीन दिवसांनंतर सोमवारी ओडिशाच्या बारगड जिल्ह्यात मालगाडीच्या पाच बोगी रुळावरून घसरल्या. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले की, जिथे हा अपघात झाला, तो खाजगी नॅरोगेज रेल्वे मार्ग आहे. येथे असलेल्या लाईन, वॅगन, लोको हे सर्व खाजगी कंपनीच्या अंतर्गत येतात. त्याचा रेल्वेशी काहीही संबंध नाही.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube