E20 पेट्रोलमुळे नाही ‘या’ कारणाने गाडी बंद; युट्युबर मनीष कश्यप यांच्या आरोपांवर टोयोटाची पहिली प्रतिक्रिया

Manish Kashyap On Innova Hycross E20 Petrol : देशाच्या राजकारणात E20 पेट्रोल चर्चेत असून मोदी सरकारवर जोरदार टीका होताना दिसत आहे.

Manish Kashyap On Innova Hycross E20 Petrol

Manish Kashyap On Innova Hycross E20 Petrol : देशाच्या राजकारणात E20 पेट्रोल चर्चेत असून मोदी सरकारवर जोरदार टीका होताना दिसत आहे. या पेट्रोलमुळे वाहनांचे नुकसान होत असल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे. बिहारमधील युट्यूबर मनीष कश्यप यांनी देखील सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत या पेट्रोलमुळे टोयोटा इनोव्हा हायक्रॉस खराब झाल्याचा दावा केला आहे. तसेच त्यांनी या व्हिडिओत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. तर आता या संपूर्ण प्रकरणावर टोयोटानेही प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी युट्यूबर मनीष कश्यप यांच्यावर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती एका कार्यक्रमात बोलतान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.

मनीष कश्यप यांनी E20 पेट्रोलमुळे टोयोटा इनोव्हा हायक्रॉस खराब झाल्याचा दावा केला होता. या प्रकरणात टोयोटाने या कारची तपासणी केली असता कारमध्ये भेसळयुक्त पेट्रोल असल्याने कारमध्ये खराबी आल्याची माहिती दिली आहे. तसेच या प्रकरणात मनीष कश्यप यांच्याविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

मनीष कश्यप यांचे आरोप काय?

सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या या व्हिडिओत मनीष कश्यप (Manish Kashyap) यांनी दावा केला आहे की, E20 पेट्रोल वापरल्यानंतर इनोव्हा हायक्रॉसमध्ये (Innova Hycross E20 Petrol) इंजिन गाडी चालवताना बंद पडतो तसेच नॉकिंगचा आवाज येतो. तसेच त्यांनी या व्हिडिओमध्ये फ्यूल टँक ओपन करुन ठेवल्याचे दिसत आहे. व्हिडिओत त्यांनी दाखवलं की, टँकच्या विविध भागांतून काढलेल्या पेट्रोलचा रंग बदललेला होता आणि त्यात घाण किंवा कचरा दिसून येत आहे.

या व्हिडिओत मनीष कश्यप यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि सरकराच्या E20 इंधन धोरणावर जोरदार हल्लाबोल केला. कारच्या फ्युएल कॅपवर E20 पेट्रोलसाठी (E20 Petrol) अनुकूल असे लिहिलेले असूनही अवघ्या काही महिन्यांतच कारमध्ये बिघाड झाला आहे. त्यांनी मागणी केली की, जनतेला सामान्य पेट्रोल खरेदी करण्याचा पर्यायही उपलब्ध असावा अशी मागणी त्यांनी या व्हिडिओत केली आहे.

तर दुसरकीडे या व्हिडिओमध्ये त्यांनी वॉरंटीबाबत देखील आपली चिंता व्यक्त केली. त्यांनी  2,00,000 किमीपर्यंतची ‘एक्स्टेंडेड वॉरंटी’ घेतली होती, परंतु जर कंपनीने इंधनातील समस्यांचे कारण देऊन दावा (Claim) फेटाळला, तर त्याचे नुकसान भरपाई कोण देणार ?  हे प्रकरण न्यायालयात नेण्याचाही विचार करतो असं त्यांनी या व्हिडिओत सांगितलं आहे. तर आता या प्रकरणावर टोयाटोची प्रतिक्रिया समोर आली आहे.

टोयोटा मोटर्सने एक अधिकृत निवेदन जारी केले आणि मनीष यांचे आरोप फेटाळून लावले. कंपनीने म्हटले आहे की, ही कार E20 इंधनासाठी 100% सुरक्षित आहे. टोयोटा इनोव्हा हायक्रॉसची रचना, चाचणी आणि प्रमाणीकरण (Certification) विशेषतः E20 इंधनासाठीच करण्यात आले आहे. E20 पेट्रोल वापरल्याने गाडीचे कोणतेही नुकसान होत नाही. आमच्या तांत्रिक पथकाने केलेल्या सखोल तपासणीत असे आढळून आले की, गाडीमध्ये भेसळयुक्त इंधन वापरले गेले होते. त्या पेट्रोलमध्ये कचरा आणि बाहेरील अशुद्ध घटक (Contaminants) होते अशी प्रतिक्रिया टोयोटो मोटर्सकडून देण्यात आली आहे. तसेच गाडीच्या कोणत्याही भागाचे किंवा इंधन प्रणालीचे (Fuel System) नुकसान झालेले नाही.

‘विश्वचषक फिक्स आहे; अर्जेंटिना जिंकेल’ ; इजिप्शियन फुटबॉलपटूचा फिफावर मोठा आरोप-

सर्व्हिसिंगच्या नियमांनुसार, टाकी आणि पाईपलाईन्समधील दूषित इंधन काढून टाकण्यात आले असून पुन्हा प्रमाणित E20 पेट्रोल भरण्यात आले. आता गाडी उत्तम प्रकारे चालत आहे आणि ती ग्राहकाला परत देण्यात आली असल्याची माहिती देखील टोयोटाकडून देण्यात आली आहे.

follow us