भारताचे आभार! ३०० अब्ज डॉलर्सच्या करारानंतर खूश झाले ट्रम्प; रिलायन्सचा खारीचा वाटा
Oil refinery अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी टेक्सास येथे ५० वर्षांतील पहिला तेल शुद्धीकरण कारखाना उभारला जाणार असल्याची घोषणा केली.
President Trump announces Reliance investment to build American oil refinery : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टेक्सासमध्ये ३०० अब्ज डॉलर्सच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पाच्या कराराची घोषणा केली आहे. यासाठी त्यांनी भारतीय कंपनी रिलायन्सचे आभार मानले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी एक मोठी घोषणा केली. त्यांनी घोषणा केली की टेक्सासमधील ब्राउन्सविले येथे ३०० अब्ज डॉलर्स (अंदाजे २५ लाख कोटी रुपये) चा नवीन तेल शुद्धीकरण कारखाना बांधला जाईल.
Crude Oil : इजिप्तच्या ममी ते तुमच्या कारची टाकी : कच्च्या तेलाचा ५००० वर्षांचा रंजक इतिहास!
ट्रूथ सोशल पोस्टमध्ये या प्रकल्पाची घोषणा करताना ट्रम्प म्हणाले की, गेल्या ५० वर्षात अमेरिकेतील हा पहिलाच नवीन तेल शुद्धीकरण कारखाना असेल. ट्रम्प यांनी या प्रकल्पाला अमेरिकन इतिहासातील सर्वात मोठा करार” म्हटले आणि भारतीय भागीदारांचे, विशेषतः रिलायन्स इंडस्ट्रीजचे त्यांच्या “मोठ्या गुंतवणुकीबद्दल” आभार मानले आहेत. ही रिफायनरी टेक्सासमधील ब्राउन्सविले येथे उभारली जाईल. अमेरिकेत ऊर्जा उत्पादन वाढवणे आणि आंतरराष्ट्रीय भागीदारांसोबत आर्थिक संबंध मजबूत करणे या उद्देशाने ३०० अब्ज डॉलर्सच्या कराराचा हा एक भाग आहे. President Trump announces Reliance investment to build American oil refinery
…म्हणून भारताला रशियाकडून तेल खरेदीची परवानगी; अमेरिकेने सांगितले धक्कादायक कारण
ट्रम्प म्हणाले की, ब्राउन्सव्हिल बंदरात बांधण्यात येणारी ही रिफायनरी अमेरिकन बाजारपेठेला इंधन देईल, राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करेल, अमेरिकन ऊर्जा उत्पादन वाढवेल, जागतिक निर्यात वाढवेल आणि दक्षिण टेक्सासमध्ये हजारो नोकऱ्या निर्माण करेल. त्यांनी दावा केला की ही जगातील सर्वात स्वच्छ रिफायनरी असेल. इराणसोबत सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक तेल पुरवठ्याला धोका निर्माण झाला आहे अशा वेळी ही घोषणा करण्यात आली आहे.
US President Donald Trump posts on Truth Social – "America is returning to REAL ENERGY DOMINANCE! Today, I am proud to announce that America First Refining is opening the FIRST new U.S. Oil Refinery in 50 YEARS in Brownsville, Texas. THIS IS A HISTORIC $300 BILLION DOLLAR DEAL —… pic.twitter.com/XBppHiCQi8
— ANI (@ANI) March 10, 2026
महान लोकांचा हा विजय
अमेरिका पुन्हा एकदा ऊर्जा वर्चस्व राखण्याकडे वाटचाल करत आहे. आज मला अभिमानाने घोषणा करावीशी वाटते की, अमेरिकेच्या टेक्सासमधील ५० वर्षांतील पहिला तेल शुद्धीकरण प्रकल्प उभा राहत आहे. हा ३०० अब्ज डॉलर्सचा ऐतिहासिक असा करार आहे. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा, अमेरिकन कामगार, ऊर्जा आणि दक्षिण टेक्सासच्या महान लोकांचा हा विजय आहे.
