प्रभाव हा हानिकारक गोष्टींच्या जाहिरातीचा परवाना नाही; राष्ट्रपतींचा व्हिडीओ अन् मुंढेंनी टोचले सेलिब्रेटींचे कान
Tukaram Mundhe celebrities FDA ने सार्वजनिक आरोग्यास हानिकारक पदार्थांच्या जाहिराती करणाऱ्या बॉलीवूड सेलिब्रिटींकडे मोर्चा वळवला आहे.
Tukaram Mundhe criticize celebrities who advertise products harmful by posting video of President : राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भेसळयुक्त अन्नपदार्थ, आरोग्यासाठी घातक उत्पादने आणि अस्वच्छ आस्थापनांविरोधात व्यापक मोहीम सुरू केली आहे. याच मोहिमेचा पुढचा टप्पा म्हणून आता FDA ने सार्वजनिक आरोग्यास हानिकारक पदार्थांच्या जाहिराती करणाऱ्या बॉलीवूड सेलिब्रिटींकडे मोर्चा वळवला आहे. यासाठी आता त्यांनी थेट राष्ट्रपतींचा व्हिडीओ शेअर करत सेलिब्रेटींचे कान टोचले आहेत.
नेमकं काय म्हणाले तुकाराम मुंढे?
प्रभावशाली व्यक्ती असणे म्हणजे कायद्यापासून सूट मिळणे नव्हे.कलाकारांनी इतर नागरिकांप्रमाणेच कायद्याचा आदर केला पाहिजे. तसेच उत्पादनांचा, वर्तणुकीचा किंवा सवयींचा प्रचार करताना त्यातून जनतेच्या निवडींवर होणाऱ्या परिणामांची जबाबदारीही त्यांनी ओळखली पाहिजे.
जेव्हा प्रभावशाली व्यक्ती खाद्यपदार्थांचा प्रचार करतात, तेव्हा सार्वजनिक आरोग्याचा मुद्दा दुर्लक्षित करून चालणार नाही.महाराष्ट्रात व्यापक जनहिताच्या दृष्टीने चिंता निर्माण करणाऱ्या जाहिरातींमध्ये सहभागी झालेल्या काही कलाकारांना आम्ही यापूर्वीच नोटिसा बजावल्या आहेत.
Influence is not immunity.
Artists, like everyone else, must respect the law and recognise the responsibility that comes with endorsing products, behaviours and habits that shape public choices.
When influence is used to endorse food products, public health cannot be an…
— Tukaram Mundhe (@Tukaram_IndIAS) September 23, 2026
कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही. तसेच आपल्या प्रभावाचा वापर सार्वजनिक आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकणाऱ्या उत्पादनांच्या प्रचारासाठी करण्याचा परवाना कोणालाही मिळू शकत नाही.तत्त्व अगदी स्पष्ट आहे—कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही आणि कोणत्याही व्यावसायिक हितापेक्षा सार्वजनिक आरोग्याला प्राधान्य असले पाहिजे.
मुंढेंनी शेअर केला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यां व्हिडीओ
भारतीय चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा 72वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा 22 सप्टेंबर 2026 रोजी गुजरातमधील एकता नगर, केवडिया येथे पार पडला. (National Film) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 2024 सालातील चित्रपटांसाठी विविध श्रेणीतील पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी मुर्मू यांनी कलाकारांच्या प्रभावाचा समाजावर परिणाम होत असल्याचं म्हटलं. त्यामुळे कलाकरांनी अशा कोणत्याही चुकीच्या गोष्टींच्या जाहिराती करू नये ज्याचा समाजावर विपरित परिणाम होईल असंही त्या म्हणाल्या.