केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची मोठी घोषणा, 6 महिन्यांत टोलनाके हद्दपार होणार
नवी दिल्ली : तुम्हीही तुमच्या कारने हायवेवरून प्रवास करत असाल तर तुम्हाला टोल प्लाझावर वेळ घालवायला आवडणार नाही. टोलनाक्यांवर लागणारा सरासरी वेळ कमी करण्यासाठी सरकारकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. या क्रमाने, देशातील महामार्गांवरील सध्याचे टोलनाके हटवण्यासाठी सरकार येत्या सहा महिन्यांत GPS आधारित टोल संकलन प्रणाली आणि इतर तंत्रज्ञान आणणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत माहिती दिली.
महामार्गावरील जाम पासून वाचवण्याचा उद्देश
महामार्गांवर जाम होण्यापासून वाचवणे हा या मागचा उद्देश असल्याचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. भारतीय उद्योग संघटना कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) च्या एका कार्यक्रमात गडकरी म्हणाले की, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) कडे सध्या 40,000 कोटी रुपयांचा टोल महसूल आहे. येत्या दोन-तीन वर्षांत ती वाढून 1.40 लाख कोटी होईल. ते म्हणाले, ‘देशातील महामार्गांवर असलेले टोल प्लाझा हटवण्यासाठी सरकार जीपीएस आधारित टोल सिस्टिमसारखे तंत्रज्ञान आणण्याचा विचार करत आहे. सहा महिन्यांत नवीन तंत्रज्ञान सरकार आणणार आहे.
Maharashtra : सत्ता बदलते पोलीस दल तेच असते; गृहमंत्र्यांनी सांगितली सत्य परिस्थिती
टेस्टिंग वरती काम सुरु आहे
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय वाहने न थांबवता टोल वसूल करण्यासाठी स्वयंचलित नंबर प्लेट ओळख प्रणाली (स्वयंचलित नंबर प्लेट रीडर कॅमेरा) टेस्टिंग योजनेवर काम करत आहे. 2018-19 या आर्थिक वर्षात टोल प्लाझावर वाहन थांबण्याची सरासरी वेळ 8 मिनिटे होती. 2020-21 आणि 2021-22 मध्ये FASTag लागू केल्यानंतर, टोल प्लाझावर वाहनांची थांबण्याची सरासरी वेळ 47 सेकंदांवर आली आहे.