यूपीच्या गुंडांचा कर्दनकाळ ठरलेले अमिताभ यश आहेत तरी कोण?

यूपीच्या गुंडांचा कर्दनकाळ ठरलेले अमिताभ यश आहेत तरी कोण?

Asad Ahmed Encounter: माफिया डॉन अतिक अहमदचा (Atik Ahmed)मुलगा असद (Asad Ahmed)आणि शूटर गुलाम (Gulam)यांचं आज झांशीमध्ये (jhanshi) यूपी एसटीएफने (UP STF)एन्काउंटर (Encounter)केलं आहे. डेप्युटी एसपी नवेंदू आणि डेप्युटी एसपी विमल यांच्या नेतृत्वाखाली यूपी एसटीएफ टीमने ही कारवाई केली. एसटीएफचे एडीजी अमिताभ यश (Amitabh Yash) यांनी ही माहिती दिली आहे. दोन्ही आरोपींना जिवंत पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी केलेल्या प्रत्युत्तर कारवाईत दोघेही ठार झाले. अमिताभ यांनी याआधी उत्तर प्रदेशमधील अनेक मोठ्या प्रकरणांमध्ये गुन्हेगारांवर कारवाई केली आहे.

Narayan Rane : विरोधकांकडे बोंबलाय शिवाय काही नाही, राणेंचा मविआला टोला

बिहारमधील भोजपूर येथून आलेले अमिताभ यांचे वडील राम यश सिंह हे देखील आयपीएस होते. दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. आणि ते आयपीएस झाले. अमिताभ यश यांचा पहिला जिल्हा संतकबीरनगर होता. येथे 11 महिने सेवा केल्यानंतर, बाराबंकी महाराजगंज, हरदोई, जालौन, सहारनपूर, सीतापूर, बुलंदशहर, नोएडा आणि कानपूर येथे एसपी आणि एसएसपी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.

2007 मध्ये मायावती सरकारमध्ये अमिताभ एसटीएफचे एसएसपी बनले. यादरम्यान त्यांनी बुंदेलखंडच्या जंगलात डाकू दादुआच्या विरोधात मोहीम सुरु केली आणि त्याला ठार मारले. याशिवाय त्यांच्या पथकाने डाकू ठोकियालाही ठार केले. चित्रकूटची जंगले डाकूंपासून मुक्त करण्याचे श्रेयही अमिताभ यश यांना जाते. मे 2017 मध्ये ते योगी सरकारमध्ये एसटीएफचे आयजी बनले. त्यानंतर जानेवारी 2021 मध्ये ते एसटीएफचे एडीजी बनले.

अमिताभ यश यांनी त्यांच्या कारकिर्दीत 150 हून अधिक गुन्हेगारांना मारले आहे. त्यांनी यूपीतील मुख्तार आणि अतिक टोळीतील सर्व शार्प शूटर्सना ठार मारले आहे. राज्यातील पेपर लीक टोळीपासून ते डार्क वेबवरून अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीपर्यंत त्यांनी मुसंडी मारली. कानपूरचा कुख्यात गुन्हेगार विकास दुबे आणि त्याच्या टोळीचाही अमिताभ यशच्या टीमने खात्मा केला होता. यूपीचा आयुष भरती घोटाळा, टीईटी पेपर लीक, पशुसंवर्धन घोटाळा यांसह अनेक मोठी प्रकरणे उघड करून आरोपींना तुरुंगात पाठवण्याचे कामही अमिताभ यश यांनी केले आहे.

उमेश पाल हत्याकांडातील फरार असद अहमद आणि शूटर गुलाम यांच्या एन्काउंटरवर राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एसटीएफच्या संपूर्ण टीमचे कौतुक केले आहे. यासोबतच त्यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत मोठी बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री योगी यांनी यूपी एसटीएफ तसेच डीजीपी, विशेष डीजी कायदा आणि सुव्यवस्था आणि संपूर्ण टीमचे कौतुक केले. या चकमकीची माहिती गृह प्रधान सचिव संजय प्रसाद यांनी मुख्यमंत्र्यांना दिली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube