Rahul Gandhi: राहुल गांधींना दिलासा मिळणार? आज सुरत कोर्टात सुनावणी होणार

Rahul Gandhi: राहुल गांधींना दिलासा मिळणार? आज सुरत कोर्टात सुनावणी होणार

Verdict On Rahul Gandhi In Surat Court : काँग्रेस नेते नी 2019 सालच्या निवडणुकीमध्ये मोदी समाजाविषयी आक्षेपार्ह शब्द वापरल्याने त्यांच्यावर केस दाखल करण्यात आली होती. यावरुन त्यांना न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. आता पुन्हा एकदा त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यानंतर आज पुन्हा सुरत न्यायालयामध्ये मोदी समाजाविषयी आक्षेपार्ह शब्द वापरल्याच्या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये राहुल गांधींना दिलासा मिळणार की हे पाहण महत्त्वाचं आहे. तर कॉंग्रेस कार्यकर्ते आजच्या या सुनावणीकडे डोळे लावून बसले आहे. तर या प्रकरणी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे.

Rahul Gandhi जाणार सोनिया गांधींच्या घरी राहायला!

दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल गांधींच्या विरोधात पुण्यामध्ये तक्रार करण्यात आली आहे. राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठात 28 फेब्रुवारी रोजी भाषण दिले होते त्यावेळी त्यांनी सावकरांविषयी आक्षेपार्ह विधान केले होते.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सत्यकी सावरकर यांनी राहुल गांधींच्या विरोधात पुणे न्यायालयामध्ये बदनामीचा खटला दाखल केला आहे. त्यामुळे राहुल गांधींच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सावरकरांची प्रतिष्ठा खराब करण्याचा प्रयत्न राहुल गांधींनी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube