Video : बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमात लहान मुलीला आईसमोरच उचलून फेकलं…

Video : बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमात लहान मुलीला आईसमोरच उचलून फेकलं…

वादग्रस्त विधानांमुळे कायमच चर्चेत असलेले बागेश्वर धामचे पंडित धिरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. abhishek_as_it_is या इन्टाग्राम अकाऊंटवरन हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला असून व्हिडिओमध्ये कार्यक्रम सुरु असताना सुरक्षा रक्षकाने लहान मुलीला उचलून बॅरिकेट्सच्या बाहेर फेकण्यात आलं आहे. या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतं आहे.

व्हिडिओमध्ये बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्री यांचा कार्यक्रम सुरु आहे. बाबांच्या कार्यक्रमासाठी दुरवरुन अनेक भाविक येत असतात. यामध्ये महिलांसह पुरुष तरुण-तरुणांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्यांच्या कार्यक्रमात अनेक लोकं आपली समस्या बाबांना सांगत असतात. त्यानंतर बागेश्वर बाबा त्यांच्या समस्येच निराकरण करीत असतात.

मंत्रिपदाची सुत्रे हाती येताच दादांचा पाय खोलात? लवासा प्रकरणी उच्च न्यायालयात 21 जुलैला सुनावणी

मात्र, एका कार्यक्रमात अमानवी प्रकार घडल्याचं निदर्शनास आलं आहे. एका बाजूला कार्यक्रम सुरु असताना एक मुलगी बॅरिकेट्सच्या आतमध्ये आली होती. यावेळी तिला हाकलून लावण्यासाठी सुरक्षा रक्षकाने मुलीला उचलून बाहेर फेकल्याचं दिसून येत आहे. यावेळी कार्यक्रमात पोलिसही उपस्थित होते. हा प्रकार सदर मुलीच्या आईसमोरच घडला आहे.

घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. घटनेचा व्हिडिओ पाहुन बाबांवर कारवाई करण्याची मागणी नेटकऱ्यांकडून केली जात आहे. दरम्यान, याप्रकरणी तक्रार न करण्यासाठी बागेश्वर मठ प्रशासनाकडून सदर तरूणीच्या कुटुंबियांवर दबाव आणला जात असल्याचा दावा या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये करण्यात आला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube