Video : अमेरिकेसोबतची डील म्हणजे भारतमातेची विक्रीच; राहुल गांधी थेट आरोप; भाजपचंही प्रत्युत्तर
व्यापार कराराद्वारे सरकारने गरीब शेतकऱ्यांना चिरडण्याचा मार्ग मोकळा केला आहे. देशाच्या कोणत्याही पंतप्रधानांनी असे यापूर्वी केलेले नाही
Rahul Gandhi On India-US trade deal : अमेरिेसोबत झालेला करार म्हणजे भारत मातेची विक्री असल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. ते लोकसभेत बोलत होते. केंद्र सरकारने अमेरिकेच्या दबावाखाली व्यापार करार केला असून भारताने जर त्यांच्या शर्थींचे पालन करण्यास नकार दिला तर अमेरिका पुन्हा शुल्क वाढवेल असेही राहुल गांधी म्हणाले.
Video : अजितदादांबद्दलची मुंबईत न सांगितलेली गोष्ट रोहित पवारांनी दिल्लीत जाऊन सांगितली…
भारताला विकणारा अजून जन्माला आलेला नाही
अमेरिका भारताच्या डेटावर लक्ष ठेवून आहे. देशातील डेटा विकला गेला आहे, शेतकरी विकला गेला असल्याचे राहुल गांधी म्हणाले. त्यावर भारत देश विकणारा कोणीही जन्माला आलेला नसल्याचे प्रत्युत्तर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी राहुल यांना दिले. देश विकत घेऊ शकणारा किंवा विकू शकणारा कोणीही जन्माला आलेला नाही. पंतप्रधान मोदी हे आतापर्यंतचे सर्वात बलवान पंतप्रधान असल्याचेही रिजिजू म्हणाले.
काँग्रेस नेहमीच देशाला कमकुवत करू इच्छित असल्याचेही रिजिजू म्हणाले. मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो: अमेरिका आणि चीनमधील स्पर्धेत सर्वात मौल्यवान संपत्ती म्हणजे भारतीय डेटा. जर अमेरिकेला महासत्ता राहायचे असेल आणि अमेरिकेला त्यांचे डॉलर सुरक्षित ठेवायचे असेल तर भारतीय डेटा सर्वात महत्वाचा आहे. Rahul Gandhi On India-US trade deal
प्रत्यक्षात आपण युद्धाच्या काळात जगतोय. तुम्ही पाहू शकता युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. गाजामध्ये युद्ध आहे. मिडिल ईस्टमध्ये युद्ध आहे. इराणमध्ये युद्धाचा धोका आहे. आपण ऑपरेशन सिंदूर केलं. आपण अस्थिरतेच्या विश्वात जगतोय. डॉलरला आव्हान दिलं जातय. माझे मित्र समजतायत, मुख्य खेळ हा आहे की डॉलरला आव्हान दिलं जातय. US च्या दबदब्याला आव्हान दिलं जातय. आपण सुपरपावरच्या विश्वाकडून कुठल्या नव्या देशाकडे जातोय. त्याचा आपण अंदाज लावू शकत नाही” असं राहुल गांधी म्हणाले.
राष्ट्रगीतापूर्वी वाजवले जाणार वंदे मातरम्; 3 मिनिटे 10 सेकंद उभे राहणे बंधनकारक; मोठे आदेश निघाले
…तर आम्ही ट्रम्प यांना थेट सांगितलं असतं
जर इंडिया अलायन्सची प्रेसिडेंट ट्रम्प यांच्यासोबत चर्चा सुरु असती, तर मी तुम्हाला सांगतो, आम्ही पहिलं काय केलं असतं, सर्वात पहिलं आम्ही प्रेसिडेंट ट्रम्पला बोललो असतो, या इक्वेशनमध्ये सर्वात जास्त महत्वाचा आहे इंडियन डेटा. तु्म्हाला तुमचा डॉलर वाचवायचा असेल, तर आम्ही तुमचे मित्र आहोत. आम्ही तुम्हाला तुमचा डॉलर वाचवायला मदत करु शकतो. तुमच्या डॉलरला वाचवू शकते अशी गोष्ट इंडियन लोकांकडे आहे. जर, तुम्हाला या डेटाचा एक्सेस हवा असेल, तर चर्चा समान पातळीवर झाली पाहिजे. आम्ही तुमचे नोकर आहोत असे तुम्ही बोलू नका” असं राहुल गांधी म्हणाले.
