पश्चिम बंगालमध्ये इतिहासात पहिल्यांदाच विक्रमी मतदान; ममतादिदीला धक्का की भाजपला संधी ?
West Bengal Elections-अनेक जिल्ह्यांमध्ये 90 टक्क्यांहून दक्षिण दिनाजपूरमध्ये जवळपास 94.77 टक्के मतदान झाले आहे.
West Bengal Elections : तब्बल पंधरा वर्षे ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांची सत्ता असलेल्या पश्चिम बंगालमध्ये (West Bengal Election) पहिल्या टप्प्यात विक्रमी 91.91 टक्के मतदान झालाय. तर एआयडीएमके आणि डीएमकेमध्ये चुरस असलेल्या तामिळनाडू राज्यातही 84.72 टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे दोन्ही राज्यामधील सत्ताधारी पक्षांचे टेन्शन वाढले आहे. पश्चिम बंगालमध्ये तर भाजप (bjp) आणि ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये टफ फाइट आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी हिंसक घटना घडल्या आहेत. विक्रमी मतदानाबाबत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी दोन्ही राज्यांतील मतदारांचे कौतुक केले आणि स्वातंत्र्यानंतरचे हे सर्वाधिक मतदान असल्याचे म्हटले.
सिद्धेश्वर एक्सप्रेस लुटण्यासाठी महिलांनी रचला कट; आरपीएफने टोळीचा डाव ‘असा’ उधळविला !
पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत स्वातंत्र्यानंतरचे सर्वाधिक मतदान नोंदवले गेले आहे. मी पश्चिम बंगालच्या सर्व मतदारांना सलाम करतो. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या दोन्ही राज्यांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांचे मतदान जास्त आहे. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात 152 जागांवर मतदान झाले आहे. उर्वरित जागांसाठी दुसऱ्या टप्प्यात 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये 90 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद झाली आहे. जिल्हावार आकडेवारीनुसार, दक्षिण दिनाजपूरमध्ये जवळपास 94.77 टक्के मतदानासह सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ कूचबिहारमध्ये 94.40 टक्के, बीरभूममध्ये 93.61 टक्के, जलपाईगुडीमध्ये 93.01 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
कोट्यवधींच्या व्यवहारांवर प्रश्नचिन्ह, राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे पदावरून पायउतार
General Elections to Legislative Assemblies and bye-elections 2026#TamilNadu (84.69%) and #WestBengal (Phase-I) (91.78%) record highest-ever poll participation since Independence
Read more : https://t.co/VTBMzHvamP pic.twitter.com/jYGAbAvgRu
— Election Commission of India (@ECISVEEP) April 23, 2026
मालदामध्ये 92 टक्के मतदान
मतदार यादीमुळे संघर्ष झालेल्या मालदा शहरामध्ये तब्बल 92. 22 टक्के मतदान झाले आहे. मालदा मतदारसंघात मतदार यादीच्या कामासाठी गेलेल्या न्यायालयाचे अधिकारी आणि कर्मचारी यांना घेरावे घालण्यात आला होता. त्यातून न्यायालयाच्या अधिकाऱ्यांच्या सुटका करण्यासाठी थेट देशाच्या सरन्यायाधीशांना हस्तक्षेप करावा लागला होता.
विक्रमी मतदानामुळे ममता दिदींच्या पोटात गोळा ?
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यासाठी विक्रमी मतदान झाले आहे. विशेष म्हणजे महिला आरक्षण दुरुस्ती विधेयक लोकसभेत फेटाळल्या गेल्यानंतर ही निवडणूक होत आहे. भाजपने राजकीय फायदा उठविण्याचा प्रयत्न केला आहे. नेमकी त्याचा परिणाम आहे की ममता बॅनर्जी यांच्याविरोधात जनमत आहे हे मत मोजणीचा दिवशी स्पष्ट होईल. दरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते सुवेंदू अधिकारी यांनी भाजप 152 पैकी 125 जागा जिंकेल, असा दावा केला आहे.