काँग्रेस नेत्याची जीभ घसरली, पंतप्रधानांना म्हणाले पगला मोदी; आप-तृणमूलवरही आगपाखड

काँग्रेस नेत्याची जीभ घसरली, पंतप्रधानांना म्हणाले पगला मोदी; आप-तृणमूलवरही आगपाखड

Adhir Ranjan Chowdhury on PM Modi : काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury) आपल्या वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या याच वक्तव्यांना काँग्रेसला (Congress) अनेकदा अडचणीत आणलं आहे. आता त्यांनी पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ज्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पश्चिम बंगालमध्ये दोन हजार रुपयांच्या नोटबंदी संदर्भात त्यांनी मोदी यांच्यावर निशाणा साधला. चौधरी म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था सध्या ठीक नाही. अशा परिस्थितीत दोन हजारांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे. हा मोदी नसून पगला मोदी आहे. लोक म्हणतात पगला मोदी.

याआधी केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यातील बैठकीवर चौधरी म्हणाले, आप आणि टीएमसी काँग्रेसला कमजोर करण्यासाठी आणि स्वतःची ताकद वाढविण्यासाठी एकाच रणनितीवर काम करत आहेत. असे करून दोघेही एक प्रकारे भाजपाची मदतच करत आहेत.

मुर्शिदाबाद येथे पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत चौधरी यांनी भाजप, पंतप्रधान मोदी, आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेसवर जोरदार प्रहार केले. ते म्हणाले, दोन्ही पक्ष काँग्रेसला नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. आप, तृणमूल काँग्रेस या दोन्ही पक्षांतील एकही नेता भाजप किंवा मोदींविरोधात बोलत नाही. दोन्ही पक्षांची भाजपबरोबर मिलीभगत आहे, असा आरोप चौधरी यांनी केला. ममता आणि केजरीवाल दोघेही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपशी स्पर्धा करत आहेत. काँग्रेसला कमजोर करणे आणि स्वतःची ताकद वाढविणे हे या दोन्ही पक्षांचे ध्येय आहे.

कर्नाटकात काही महत्वाच्या मतदारसंघात काँग्रेसचा पराभव झाला. कर्नाटकातील निवडणुकांच्या आधीपर्यंत भाजपने देखील तृणमूल विरोधात चकार शब्दही काढला नाही. आता या निवडणुकीनंतर लोक मोदींना पर्याय मागत आहेत. लोक या सरकारला वैतागले आहेत त्यामुळे आता हे स्पष्ट होत आहे की काँग्रेसने नेतृत्व केल्याशिवाय विपक्षी गठबंधन प्रत्यक्षात येणार नाही.

संसद भवनाचा वाद पेटला! राष्ट्रपतींचे नाव घेत विरोधकांचा कार्यक्रमावरच बहिष्कार

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube