WB Panchayat Election 2023 : पश्चिम बंगालमध्ये आज पुन्हा मतदान, हिंसाचारानंतर निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

  • Written By: Published:
WhatsApp Image 2023 07 10 At 7.45.53 AM

WB Panchayat Election 2023 : पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकीसाठी शनिवारी (8 जुलै) मतदान झाले. यादरम्यान अनेक जिल्ह्यातून हिंसक घटना समोर आल्या. या हिंसक संघर्षात एकूण 15 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर राज्यातील सर्वच राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत.

मतदान संपल्यानंतर, राज्य निवडणूक आयुक्त (SEC) राजीव सिन्हा यांनी शनिवारी संध्याकाळी सांगितले होते की पर्यवेक्षक आणि रिटर्निंग अधिकाऱ्यांकडून अहवाल मिळाल्यानंतर ते मतदानाच्या छेडछाडीच्या तक्रारींवर लक्ष देतील आणि हिंसाचारग्रस्त ठिकाणी पुन्हा मतदान घेण्याचा निर्णय घेतील. (West Bengal Panchayat Election 2023 Repoling  Panchayat Election Violence)

मतदानादरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर, पश्चिम बंगाल राज्य निवडणूक आयोगाने रविवारी (9 जुलै) जाहीर केले की, ग्रामीण निवडणुकीसाठी मतदान रद्द घोषित करण्यात आलेल्या सर्व बूथवर सोमवारी (10 जुलै) पुन्हा मतदान घेण्यात येईल. मत छेडछाड आणि हिंसाचाराच्या अहवालांचा अभ्यास करण्यासाठी (SEC) ने रविवारी संध्याकाळी बैठक घेतली.

एकूण 697 बूथवर मतदान होणार आहे.

अधिका-यांनी सांगितले की, ज्या जिल्ह्यांमध्ये पुनर्मतदान जाहीर झाले, त्यापैकी मुर्शिदाबादमध्ये सर्वाधिक 175 बूथ आहेत, त्यानंतर मालदामध्ये 112 बूथ आहेत. हिंसाचारग्रस्त नादियातील 89 बूथवर फेरमतदान होणार आहे, तर उत्तर आणि दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील 46 आणि 36 बूथवर फेरमतदान होणार आहे. एकूण 697 बूथवर आज मतदान होणार आहे.

राहुल गांधींकडे ‘ही’ खास बाईक, मेकॅनिकसमोर सगळं काही सांगितलं

केंद्रीय सुरक्षा दलांच्या देखरेखीखाली मतदान होणार

शनिवारी 74 हजार पंचायतींसाठी मतदान झाले होते. यादरम्यान मोठ्या प्रमाणात हाणामारी होऊन मतदान केंद्रावर हाणामारी, बूथ लुटणे, जाळपोळ अशा घटना समोर आल्या. या हिंसाचारात अनेकांचा मृत्यू झाला असून अनेक लोक जखमी झाले आहेत.

आता अनेक बूथ चिन्हांकित करून निवडणूक आयोगाने आज फेरमतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. केंद्रीय सुरक्षा दलांच्या देखरेखीखाली मतदान होणार आहे.

Tags

follow us