अमेरिका इस्त्रायल विरुद्ध इराण युद्धाचा भडका उडाला असतानाच पाकिस्तानही पेटलं, अमेरिकन दुतावासावर हल्ला, 10 मृत्यू
खामेनेई यांच्या निधनानंतर जगभरात अशांततेच वातावरण निर्माण झाल्याची स्थिती असतानाच पाकिस्ताममधूनही मोठी घटना समोर आली
अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये युद्ध पेटले आहे. अमेरिका आणि इस्त्रायलने मिळून इराणवर मोठा हल्ला केला. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांना या हल्ल्यात ठार करण्यात आले. फक्त आयातुल्ला अली खामेनेई हेच नाही तर जवळपास त्यांचे संपूर्ण कुटुंब या हल्ल्यात ठार झाले. आयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर जगभरात अशांततेच वातावरण निर्माण झाल्याची स्थिती असतानाच पाकिस्ताममधूनही मोठी घटना समोर आली आहे.
पाकिस्तानमध्ये लोक आक्रमक झाले आहेत. कराचीमध्ये अमेरिकेच्या दुतावासाची तोडफोड करण्यात आली. पाकिस्तानमध्ये अनेक ठिकाणी दंगे भडकल्याचं बघायला मिळत आहे. लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरली असून निर्देषने करत आहेत. पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला. कराचीमध्ये स्थिती अत्यंत वाईट आहे. दंगेखोरांकडून कराची येथील अमेरिकन दूतावासाला टार्गेट करण्यात आलं. तोडफोड करत जाळपोळ करण्यात आल्याची माहिती मिळतंय. कराचीतील दंगेखोरांवर पोलिसांनी गोळीबार केला असून 10 जणांचा मृत्यु झाल्याची माहित मिळत आहे.
कराचीमधील अमेरिकन दूतावासाला मोठी आग लावली आहे. काही कर्मचारीही आतमध्ये असल्याची माहिती मिळतंय. अमेरिका आता यावर नक्की काय उत्तर देते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. अगोदरच अमेरिकेने इस्त्रायलमधील अमेरिकन नागरिकांना अलर्ट दिला होता. त्यामध्येच आता पाकिस्तानमध्ये अमेरिकत दूतावास कार्यालयाला टार्गेट करण्यात आले. पाकिस्तानमध्ये सध्या भयंकर स्थिती असल्याचे बघायला मिळतंय.
अमेरिका आणि इस्त्रायलच्या हल्ल्यात ठार झाले. फक्त आयातुल्ला अली खामेनेई हेच नाही तर त्यांच्या कुटुंबातील सर्वच सदस्य मारले गेले. इराणवर अमेरिका आणि इस्त्रायलने हल्ला केला. त्यांच्या निशाण्यावर सुरूवातीपासूनच आयातुल्ला अली खामेनेई होते. शेवटपर्यंत आयातुल्ला अली खामेनेई यांना इराणची सत्ता सोडण्यासाठी अमेरिकेकडून धमकावले जात होते. शेवटी अमेरिकने आयातुल्ला अली खामेनेई यांना ठार केले. या घटनेचे जगभर पडसाद उमटल्याचं चित्र आहे.
