अजब! दरवर्षी नवीन मुलीसोबत करतो लग्न; ५ वेळा थाटलाय संसार, पहिल्या पत्नीची पोलिसांत धाव
Husband wife cheating case : एका महिलेने आपल्याच पतीवर गंभीर आरोप केले आहेत. (Husband) मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधील ही घटना आहे. तिने सांगितलं की, माझा नवरा दरवर्षी नवीन मुलीशी लग्न करतो. आतापर्यंत त्याने पाच लग्ने केली आहेत. मी त्याच्यावर गुन्हाही दाखल केला आहे. मात्र, आजतागायत पोलिसांनी त्याला अटक केलेली नाही. आता नवरा परदेशात पळून जाण्याचा विचार करत आहे. महिलेची कहाणी ऐकून डीएसपींनी पोलिसांना याप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश दिले.
काँग्रेसच्या जागा कुणामुळे वाढल्या? काँग्रेसचं राऊतांना जशास तसं उत्तर
ममता जमरा असं पीडित महिलेचं नाव आहे. तीने एसपी कार्यालयात रडत रडत डीएसपीला काय घडलं ते सांगितलं. ती म्हणाली, माझा विवाह 23 मे 2018 रोजी मुरार तिकोनिया येथील रहिवासी रमेश सिंह शेखर यांचा मुलगा रुस्तम सिंह शेखर याच्याशी झाला होता. लग्नानंतर पती आणि सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी माझा छळ सुरू केला. नवरा सुधारेल या विचाराने मी सगळं सहन करत राहिले. पण जेव्हा माझे पती आणि सासरच्या लोकांमध्ये सुधारणा झाली नाही, तेव्हा मी 2022 मध्ये त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. ते प्रकरण अजूनही न्यायालयात प्रलंबित आहे.
तक्रारदार महिलेने तिच्या पतीवर आरोप करत सांगितलं की, लग्नानंतर तिचा सॉफ्टवेअर इंजिनीअर पती कंपनीतील कामाचं कारण सांगून बहुतेक वेळा घरातून बेपत्ता असायचा. अशा परिस्थितीत तिने चौकशी केली असता तिच्या पतीचे अनेक अफेअर असल्याचं समोर आले. यानंतर आणखी धक्कादायक बातमी ऐकायला मिळाली. नवरा दरवर्षी नवीन लग्न करतो, हाय प्रोफाईल स्टेटस दाखवत. हे सगळं कळल्यावर पायाखालची जमीनच सरकली.
महिलेच्या म्हणण्यानुसार, या कामात तिच्या बहिणी आणि भावजयांचाही तिला पाठिंबा आहे. गेल्या वर्षीच तिचा नवरा राजस्थानच्या भरतपूर येथे गेला आणि त्याने ज्योती गोयल नावाच्या मुलीशी लग्न केलं, जी त्याची पाचवी पत्नी आहे. महिलेने स्वत:च पतीची पहिली पत्नी असल्याचं सांगितलं. तिचा पती परदेशी कंपनीत काम करतो आणि त्याच्यावर दाखल झालेल्या एकाही सुनावणीत तो अद्याप हजर झालेला नाही. अशा स्थितीत त्याच्याविरोधात अनेक वॉरंटही बजावण्यात आले आहेत. मात्र पोलिसांनी अद्याप त्याला अटक केलेली नाही.
खाकी वर्दीचा राजीनामा दिल्यानंतर शिवदीप लांडेंची राजकारणात सिंघमगिरी? हा पक्ष करणार जॉईन?
आता माझा नवरा परदेशात पळून जाण्याचा विचार करत आहे. मला त्याचा पासपोर्ट आणि इतर कागदपत्रे जप्त करायची आहेत. मला फक्त या प्रकरणात न्याय हवा आहे बाकी काही नाही. डीएसपी किरण अहिरवार यांनी महिलेचं म्हणणं ऐकून घेत आरोपीवर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.