Srinagar : मला विंग कमांडरने रुममध्ये बोलावलं अन्… IAF महिला अधिकाऱ्याने केला गंभीर आरोप

  • Written By: Published:
Srinagar : मला विंग कमांडरने रुममध्ये बोलावलं अन्… IAF महिला अधिकाऱ्याने केला गंभीर आरोप

Misbehavior with IAF woman officer : एका एअर फोर्सच्या (IAF) अधिकारी महिलेने वरिष्ठ अधिकाऱ्याविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याने बलात्कार, विनयभंग आणि सातत्याने मानसिक छळ केल्याचा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आला आहे. जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर एअर फोर्स स्टेशनमधील हा प्रकार आहे. (officer) ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

दुष्काळ-अतिवृष्टी झळा! भारतात ७.२ टक्क्यांनी शेतकरी आत्महत्या वाढल्या; महाराष्ट्राची स्थिती काय?

महिला अधिकाऱ्याने असाही दावा केलाय की, यासंदर्भातील चौकशीसाठी अंतर्गत समिती स्थापन करण्यात आली होती. पण, याप्रकरणी समितीने तिचे सर्व आरोप फेटाळले आहेत. फ्लाईंग ऑफिसर महिलेने आरोप केलाय की, विंग कमांडरने नवीन वर्षाच्या निमित्ताने ३१ डिसेंबर रोजी तिला तिच्या रुममध्ये बोलावलं होतं.

रुममध्ये प्रवेश करताच महिला अधिकाऱ्याने विंग कमांडरच्या बायको आणि मुलांबाबत विचारणा केली. पण, विंग कमांडरने ते बाहेर गेल्याचं सांगितलं. त्यानंतर विंग कमांडरने अश्लील भाषा वापरून तिचा विनयभंग केला. महिला अधिकाऱ्याने सांगितलं की, ‘मी त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला पण तो थांबत नव्हता. त्यानंतर मी त्याला धक्का दिला आणि तेथून पळून आले.’ याप्रकरणी बुडगाम पोलीस स्टेशनमध्ये ८ सप्टेंबरला तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मी घाबरले होते आणि काय करावं हे मला कळत नव्हतं. या प्रकारानंतर आरोपी अधिकाऱ्याने माझ्या ऑफिसला भेट दिली. त्याने काही घडलं नसल्यासारखं वर्तन केलं. एक लग्न न झालेली मुलगी जी एअर फोर्स जॉईन झाली आहे, तिच्यासोबत असा प्रकार होणं धक्कादायक आहे, असं महिला अधिकारी म्हणाली आहे. एअर फोर्समधून देखील तक्रार दाखल करण्यासाठी मला कोणीही साथ देत नव्हतं, असंही त्या म्हणाल्या आहेत.

5000 सायबर कमांडो तयार होणार, वाढणार सुरक्षा, अमित शहांचा मोठा निर्णय

सुरुवातीला महिला अधिकाऱ्याने दोन महिला अधिकाऱ्यांना याबाबत कळवलं. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत कळवण्यास सांगितलं. त्यानंतर या प्रकरणी चौकशी सुरु करण्यात आली, पण, प्रशासनाची चूक झाकण्यासाठी हे प्रकरण बंद करण्यात आलं. तिने अनेकवेळा वैद्यकीय चाचणीची मागणी केली , पण ती देखील करण्यात आली नाही. याप्रकरणी कोणी साक्षीदार नाही, त्यामुळे प्रकरण बंद करत असल्याचं अंतर्गत समितीने सांगितलं होतं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या