20 मे रोजी शिंदेंना भेटायला बोलावलं, ते रडले…आदित्य ठाकरेंनी सांगितला घटनाक्रम

20 मे रोजी शिंदेंना भेटायला बोलावलं, ते रडले…आदित्य ठाकरेंनी सांगितला घटनाक्रम

Aditya Thackeray on Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बंडापूर्वी काही दिवसा आधी ठाकरेंच्या वर्षा निवासस्थानी आले होते. तिथे ते येऊन रडले होते, असा दावा आमदार आदित्य ठाकरे यांनी केला होता. आदित्य ठाकरेंच्या आरोपाला प्रत्युत्तर देणं मुख्यमंत्र्यांनी टाळून ”ते जाऊदे तो लहान आहे.” अशी प्रतिक्रिया दिली होती. यावर आता आदित्य ठाकरेंनी घटनाक्रम सांगितला आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले, 20 मे रोजी एकनाथ शिंदे यांना वर्षा बंगल्यावर उद्धव ठाकरेंनी बोलवलं होतं. नक्की गडबड कशामुळे सुरु आहे? त्यांना बंडखोरी का करावी वाटते? पक्षात राहायचे आहे का? मुख्यमंत्री व्हायचे आहे का? नक्की काय भीती आहे, असे त्यांना विचारले होते. हे सर्वांना माहिती आहे. पडद्याच्या आड रात्री उडी घालून कोणाला भेटायचे हे आम्हाला माहिती नव्हते. कुरबूर सुरु होती. काही आमदार आम्हाला सांगत होते. त्यासाठी उद्धवसाहेबांनी त्यांना बोलवले होते, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

उद्धव आणि आदित्य कोणाकोणासमोर रडले… लवकरच गौप्यस्फोट करणार

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बंडखोरी, हिंदुत्व, काँग्रेसबरोबर ठाकरे का गेले असा प्रश्न विद्यार्थ्याने विचारला होता. त्याला उत्तर देताना ठाकरे म्हणाले, चाळीस लोक हे पैसेसाठी आम्हाला सोडून गेले होते. एकदिवस एकनाथ शिंदे हे मातोश्रीवर आले होते. केंद्रीय एजन्सीकडून अटक होऊ शकते असे सांगून ते रडू लागले होते. त्यानंतर ते भाजपमध्ये गेले असल्याचे ठाकरे यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर? संजय राऊतांचा दावा

आदित्य ठाकरे यांनी केलेल्या या दाव्याबादत उलटसुलट चर्चा रंगलेल्या असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर प्रतिक्रिया दिली. आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यावर स्पष्ट उत्तर देणं टाळून मुख्यमंत्री म्हणाले, ”ते जाऊदे तो लहान आहे.”

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube