आदित्य ठाकरेंनी प्रदूषण नियंत्रणासाठी केंद्राचा 3 हजार 600 कोटींचा निधी परत केला; आ. कोटेजा यांचा आरोप

आदित्य ठाकरेंनी प्रदूषण नियंत्रणासाठी केंद्राचा 3 हजार 600 कोटींचा निधी परत केला; आ. कोटेजा यांचा आरोप

मुंबई : महाविकास आघाडीच्या सरकारमधील माजी पर्यावरण मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांना मुंबईतील वाढत्या प्रदूषणावरुन पत्र लिहिले आहे. मात्र आदित्य ठाकरे हे स्वत: पर्यावरण मंत्री असताना मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी केंद्राने दिलेला 3 हजार 600 कोटी रुपयांचा निधी परत गेल्याचा आरोप भाजपकडून (BJP) करण्यात आला आहे.

मुंबईत दिवसेंदिवस प्रदुषण वाढत असल्यानं हवा दुषित होत आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणावर बांधकामं सुरु आहेत. शिवाय, रस्त्याचं कॉंक्रिटीकरण, मेट्रो आणि कोस्टल रोडची कामे देखील सुरु आहेत. त्याचा थेट परिणाम स्थानिकांच्या आरोग्यवार होत आहे. मुंबईच्या दुषित हवेचा मुद्दा अधिवेशनातही गाजतोय. दरम्यान, आता भाजप आमदार मिहिर कोटेजा यांनी याप्रकरणी माजी पर्यावरण मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.

आमदार कोटेजा यांनी सांगितले की, मुंबईकरांना मोकळा श्वास घेता यावा, यासाठी एनसीएपीए अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 3 हजार 600 कोटींचा निधी दिला होता. आर्थिक वर्ष वर्ष 2021-22 मध्ये 3,600 कोंटीपैकी एक रुपया देखील तत्कालीन सरकारने खर्च केला नाही. आदित्य ठाकरे हे पर्यावरण मंत्री असताना तब्बल11 महिने केंद्राकडून आलेला निधी राज्य सरकारच्या तिजोरीत पडून होता. तत्कालीन पर्यावरण मंत्र्यांनी केंद्राकडून आलेला निधी हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी खर्च न केल्यानं हवा दुषित होत आहे. आणि आता केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांना पत्र लिहित आहेत, अशी खोचक टीका करून केंद्राकडून आलेला निधी महाविकास आघाडीने का खर्च केले नाही? असा थेट सवाल कोटेजा यांनी केला.

शेवगाव नगर परिषदेच्या कचरा डेपोला आग !

त्यांनी सांगिलं की, 2021 मध्ये WHO सेफ लिमिटमपेक्षा मुंबईच्या हवेचा दर्जा 9 पटींनी जास्त घातक होता. तेव्हा केंद्र सरकारकडून अॅडव्हायसरी आली होती. त्या अॅडव्हायसरीमध्ये नुमद केलं होतं की, पब्लिक ट्रान्सफोर्टची फ्रिक्वेन्सी वाढवावी. बसेस, मेट्रो वाढवाव्या. मात्र, हे सोडून यांनी मेट्रोचं काम बंद करण्याचं पाप केलं, अशी टीकाही कोटेजा यांनी केली.

प्रदूषित घटकांच्या वाढत्या प्रमाणामुळे मुंबईतील हवा प्रदूषण अतिप्रदूषित झाली आहे. या हवेत विषारी घटकांचे प्रमाण अतिशय वाढले आहे. तरीही 38,000 हजार झाडे कापण्याची परवानगी महानगरपालिकेने खासगी कंत्राटदारांनी दिली होती. मात्र, नंतर त्या ठिकाणी वृक्षरोपण झालं का? तर त्याचं ऑडीटही झालं नाही. झाडांची कापणी झाल्यानंतर त्याठिकाणी नवीन झाडे लावण्यात आली का, याची पाहणीच महानगरपालिकेने केली नसल्याचं नसल्याचं कोटेजा म्हणाले.

दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकार हे जलद गतीनं काम करणारं सरकार आहे. मुंबईत शनिवारपासून रोड धुण्याचं काम चालू केलं. कारण, मुंबईतील हवेत धुळीचे कण जास्त आहेत. रोड धुतल्यानं हे कण हवेत उडणार नाहीत. पर्यायाने प्रदुषण कमी होईल. एका रात्रीत याचा बदल दिसणार नाही. मात्र, याशिवायही राज्य सरकारने मुंबईतील हवेचा दर्जा कसा सुधारता येईल, यासाठी देखील सरकारकडून प्रयत्न सुरु असल्याचं कोटेजा यांनी सांगितलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube