निलेश लंकेंनंतर आता कार्यकर्त्यांनीही विखेंना डिवचलं, समोरासमोरच दिल्या भावी ‘खासदारा’च्या घोषणा

निलेश लंकेंनंतर आता कार्यकर्त्यांनीही विखेंना डिवचलं, समोरासमोरच दिल्या भावी ‘खासदारा’च्या घोषणा

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून रणनीती आखली जात असतानाच अहमदनगरमधून लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने हालचाली सुरु झाल्या आहेत. अशातच अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार सुजय विखे आणि राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालंय.

जिल्हाधिकारी कार्यालयात लंके आणि विखे आमने-सामने येताच लंके समर्थकांकडून ‘निलेश लंके भावी खासदार’ अशा घोषणा देण्यात आल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात लंके-विखे गटाचे समर्थकांमध्येही आमना-सामना झाल्याचं पाहायला मिळालंय.


Sharad Pawar यांचं स्टेटमेंट गुगली नाही, गाजराची पुंगी त्यावर उद्धवजींचा पक्ष त्रिफळाचीत झाला; शेलारांचा टोला

राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार निलेश लंके खासदार डॉ. सुजय विखे यांच्याविरोधात सातत्याने आक्रमकपणे भूमिका घेत असल्याचं दिसून येत आहे. निलेश लंकेंच्या भूमिकेवर खासदार विखे जोरदार प्रत्युत्तर देत आहेत. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत विखेविरुध्द लंके अशी लढत होणार असल्याच्या राजकीय चर्चांना उधाण असतानाच आज कार्यकर्त्यांनी विखेंसमोरच घोषणाबाजी केली आहे.

असाही कट्टर कार्यकर्ता, पवारांची भेट होताच भारावला…

गेल्या काही महिन्यांपासून आमदार लंकेही आपल्या मतदारसंघाबाहेर सक्रीय झाले आहेत. अहमदनगर दक्षिण लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसची असून या जागेसाठी मागील निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत सुजय विखेंनी जगताप यांचा दारुण पराभव करीत खासदारकी मिळवली. त्यानंतर आता सुजय विखेंविरोधात राष्ट्रवादीकडून प्रबळ उमेदवार कोण? असा सवाल उपस्थित होत असतानाच निलेश लंकेंच्या नावाची घोषणा कार्यकर्त्यांकडून करण्यात आलीय.

आमचा तो बाब्या आणि तुमचा तो कारटा…; नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

काही दिवसांपूर्वीच मुंबईत झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत अहमदनगर लोकसभेसाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून नावे सुचवण्यात आली होती. त्यामध्ये निलेश लंके यांच्या नावाची चांगलीच चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. निलेश लंके यांच्यासह राजेंद्र फाळके, अरुण जगताप, दादाभाऊ कळमकर, यांच्या नावाची चर्चा झाली होती.

पुढच्या 24 तासासाठी IMD कडून ऑरेंज अलर्ट, ‘या’ जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा इशारा

अहमदनगरमध्ये आगामी लोकसभेला सुजय विखे आणि निलेश लंके यांच्यात चुरशीची लढत होण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसून येत आहेत. कारण अहमदनगरमधील ठाकरे गट, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात विद्यमान खासदार सुजय विखे यांच्यासमोरच घोषणाबाजी केल्याने जिल्ह्याच्या राजकारणात एकच चर्चा रंगली आहे.

दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची मजबूत पकड आहे कारण पारनेर, राहुरी, अहमदनगर, अकोले तालुक्यात राष्ट्रवादीचेच वर्चस्व आहे. जिल्ह्यात पक्षाची ताकद मोठी असल्याने प्रबळ उमेदवार म्हणून लंकेंच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात येईल, असा अंदाज बांधण्यात येत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube