राऊतांच्या ‘त्या’ विधानाशी अजित पवारही असहमत; म्हणाले, ‘हा विधिमंडळाचा अपमान…’

राऊतांच्या ‘त्या’ विधानाशी अजित पवारही असहमत; म्हणाले, ‘हा विधिमंडळाचा अपमान…’

मुंबई : राज्याचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. अशातच ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी विधीमंडळाचा उल्लेख चोरमंडळ असा केला. त्यावर भाजप आणि शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. यावर आक्षेप घेत भाजप नेते आशिष शेलार यांनी राऊतांवर कारवाईची मागणी विधीमंडळाच्या अध्यक्षांकडे केली. दरम्यान, राऊतांनी केलेल्या वक्तव्यामुळे सभागृहात गोंधळ झाल्यामुळे सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं आहे. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते अजित पवार(Ajit Pawar) यांनी यावर माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी आपल्याच मित्रपक्षाच्या खासदाराला खडेबोल सुनावले.

अजित पवार म्हणाले, हे विधिमंडळ एक सर्वोच्च सभागृह आहे. या सभागृहाची परंपरा फार थोर आहे. इथे अनेक मान्यवरांनी नेतृत्व केलेलं आहे. इथे अनेक आमदार आपापल्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असतात. त्यामुळे कुणाला चोरमंडळ म्हणण्याचा अजिबात अधिकार नाही. खासदार संजय राऊतांनी केलेले वक्तव्य चुकीचे आहे. सत्ताधारी असो की विरोधक यांच्यातील कुणीच या गोष्टीचे समर्थन केले नाही. हा संपूर्ण विधिमंडळाचा अपमान आहे. आम्ही 288 प्रतिनिधी ते काम करत असतो. दोन्ही सभागृहाच्या सदस्यांचा हा अपमान आहे. ते बरोबर नाही, असं मत अजित पवार यांनी मांडलं.

ते म्हणाले, संविधानाने प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार दिला आहे. परंतु, बोलत असताना प्रत्येकाने तारतम्य बाळगायला हवे. कोणत्याही व्यक्तीने काहीही बोलून चालणार आहे. विधीमंडळाचा उल्लेख जर कोणीही म्हणजे ती व्यक्ती कोणत्याही पक्षाची असो जर असे वक्तव्य करत असेल तर त्या व्यक्तीवर योग्य ती कारवाई केली जावी, असे अजित पवार यावेळी म्हणाले.

Sanjay Raut : बाळासाहेबांसमोर होता जनता पक्षात विलीन होण्याचा प्रस्ताव

दरम्यान, आता विशेष हक्क समिती आज स्थापन करण्यात आली. आम्हाला तीन नावे मागितली. काँग्रेसला दोन नावे मागितली. इतर नावे सत्ताधारी आणि मित्रपक्षाकडून नावे जातील. समिती स्थापन करुन विशेष हक्क समितीकडे हे प्रकरण जाईल, त्यांनंतर समितीच योग्य निर्णय देईल, असं सांगत त्यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यावरुन हातवर केले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube