‘वज्रमूठ’ सभेत अजितदादा भाषण न करता परतले तर चव्हाण, राऊतांची दांडी

‘वज्रमूठ’ सभेत अजितदादा भाषण न करता परतले तर चव्हाण, राऊतांची दांडी

Ajit Pawar on Maharashtra Politics : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ होणार असल्याची चर्चा सुरु असताना दुसरीकडे अजित पवार (Ajit Pawar) यांनी नागपूरच्या (Nagpur Rally) वज्रमूठ सभेत भाषण केले नाही. अजित पवार वज्रमूठ सभेसाठी आज सकाळीचं नागपूरला गेले होते पण भाषण करणार का? याविषयी दिवसभर चर्चा रंगली होती. महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) वज्रमूठ सभा संपली त्यावेळी अजितदादा भाषण न करताच स्टेजवर बसून राहिले. त्यामुळे अजितदादा पुन्हा एकदा खळबळ उडवून देणार का? या चर्चेने जोर धरला आहे.

वज्रमूठ सभेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार अनिल देशमुख, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी भाषण केले. महाविकास आघाडीच्या सुत्रानुसार प्रत्येक पक्षातून दोन नेत्यांची भाषणे निश्चित करण्यात आली होती. यानुसार जयंत पाटील आणि अनिल देशमुख यांनी भाषण केले.

Uddhav Thackeray : शिंदे-फडणवीस सरकार उलट्या पायाचे…

छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या सभेत अजित पवार यांनी फडणवीसांचे नाव घेण्याचे थेट टाळले होते. या मुद्द्यावरुन त्यांना विचारण्यात आले असता नागपुरातील सभेत नावासह बोलू असे त्यांनी पत्रकार परिषदे सांगितले होते. आज नागपुरात पोहचल्यानंतरही त्यांनी सरकार स्थिर असल्याची प्रतिक्रिया दिली होती. आता अजित पवार यांनी नागपूरात भाषण न केल्याने वेगळ्या चर्चेंना उधान येणार आहे.

काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद?
दुसरीकडे काँग्रेसमधील देखील अंतर्गत वाद असल्याचे पाहायला मिळत आहे. वज्रमूठ सभेला काँग्रेस नेते नितीन राऊत आणि अशोक चव्हाण उपस्थित नव्हते. नितीन राऊत नाराज असल्याची चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरु आहे. अशोक चव्हाण यांनी वज्रमूठ सभेला उपस्थित राहणार नसल्याचे ट्विट करून माहिती दिली होती छत्रपती संभाजीनगर वज्रमूठ सभेला नाना पटोले उपस्थित राहिले नसल्याने चव्हाणांनी दांडी मारल्याचे बोलले जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube