भाजपने काय केलं हे माहीत नाही; सुप्रिया सुळेंच्या गौप्यस्फोटावर प्रफुल्ल पटेलांचे थेट उत्तर

  • Written By: Published:
भाजपने काय केलं हे माहीत नाही; सुप्रिया सुळेंच्या गौप्यस्फोटावर प्रफुल्ल पटेलांचे थेट उत्तर

Praful Patel On Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतरही दोन्ही गटाकडून वेगवेगळे मते व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीबाबत संभ्रम निर्माण होतात. त्यावरून राष्ट्रवादीतील दोन्ही गटाबाबत संशय व्यक्त केला जात आहेत. आता उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी एक मोठे विधान केले आहे. शरद पवार आपल्यासोबत येणार का ? या प्रश्नावर शरद पवार हे आमचे नेते आहे. त्यामुळे आमची विनंती एेवढीच राहणार की आपण एकसंघ राहिलो तर चांगली गोष्ट असे पटेल म्हणाले.

‘तु तुझी अगरबत्ती कुठे लावतो गद्दार दादुड्या?, अयोध्या पौळ यांची शिंदे गटाच्या आमदारावर बरसल्या

गोंदिया येथे माध्यमांशी बोलताना पटेल यांनी हे विधान केले आहे. पटले म्हणाले, अजितदादा आणि सर्व नेत्यांनी मिळून विचारपूर्वक हा निर्णय घेतलेला आहे. असे निर्णय हे लवकर बदलत नसतात. आम्हाला महाराष्ट्राचा विकास करायचा आहे महाराष्ट्रामध्ये आणि देशांमध्ये धैर्य टिकवून ठेवायचं असेल तर एक स्थिर सरकारंची आवश्यकता आहे.

सध्या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार चांगल्या प्रकारे काम करत आहेत. हा निर्णय सर्वांनी मिळून घेतलेला आहे. आम्ही घेतलेला निर्णय हा योग्य आहे हे सर्वांना लवकरच कळणार आहे. जयंत पाटील हे आज आमच्यासोबत नाही. त्यामुळे मला विचारून ते निर्णय घेणार नाही. परंतु ते भाजपामध्ये प्रवेश डायरेक्ट करतील असे मला वाटत नाही, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.

Video : राष्ट्रवादीच्या टीझरने विरोधकांची धाकधूक; ‘आपलं नाणं खणखणीत, भल्याभल्यांचा आवाज बंद करणार’

भाजपने तीन वेळेस राष्ट्रवादी फोडण्याचा प्रयत्न केल्याचा गौप्यस्फोट सुप्रिया सुळे यांनी केला आहे. त्यावर पटले म्हणाले, भाजपाने काय केलं हे माहीत नाही. भाजपासोबत जाण्याच्या निर्णय आम्ही आणि सर्व आमदारांनी मनापासून मिळून घेतलेला आहे आणि आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत. भाजपा आणि राष्ट्रवादी आणि एकमेकांना साथ देण्याचे आम्ही ठरवले आहे. आम्ही एनडीए मध्ये सामील झालो आहोत आणि मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करणार आहोत आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये केंद्रामध्ये मोदी सरकार आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार येणार अशी आम्हाला खात्री आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube