‘ठाकरेंचे सरकार पडणार होतं तेव्हाच आम्ही सर्वांनी…’; अजित पवारांचा मोठा खुलासा

  • Written By: Published:
‘ठाकरेंचे सरकार पडणार होतं तेव्हाच आम्ही सर्वांनी…’; अजित पवारांचा मोठा खुलासा

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर दोन्ही गटातील नेते एकमेकांवर सातत्याने टीका करत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अनेक सभांमधून शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. अजित पवार कधी शरद पवार यांचे नाव घेऊन तर कधी अप्रत्यक्षपणे टीका करत असतात. तर दुसरीकडे अजित पवार यांनी पक्षाची मूळ विचारधारा सोडून भाजपसोबत चूल मांडली, असा आरोप शरद पवार (Sharad Pawar) गटाने केला. या आरोपाला आता अजित पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.

Sanskruti Balgude : रेड ड्रेसमध्ये ‘संस्कृती’च्या ग्लॅमरस अदा 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गुरुवारी जुन्नरमध्ये सभा झाली. यावेळी अजित पवार म्हणाले, शिवसेनेसोबत सत्तेत बसलेलं चालतं, मग भाजपसोबत सत्तेत बसलेलं का चालत नाही? उद्धव ठाकरेंचे सरकार आता पडणार हे समजलं होतं, त्याचवेळी पक्षातील सगळ्यांनी ठरवलं होतं की, आपण आता भाजपबरोबर सरकारमध्ये जायचं. महाविकास आघाडीत शिवसेनेबरोबर सरकारमध्ये सहभागी झालेलं चालतं. मग, महायुतीत भाजपबरोबर गेलं तर का चालत नाही? राजकारणात वेगवेगळ्या घटना घडत असतात. पण, वरिष्ठांनी निर्णय घेतला तर तो योग्य आणि आम्ही घेतला तर तो चूक, असं कसं चालेलं? असं अजित पवार म्हणाले.

अमरावतीत अनाथ मुलांचा ‘बाप’, लाखोंना मिळाली नवी दृष्टी; महाराष्ट्रातील ‘पद्म’वीरांची कथाही अभिमानाची.. 

मोदींशिवाय पर्याय नाही
मी शेतकरी आहे, आम्ही शेतकऱ्याला एक रुपयाचा विमा दिला. केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने शेतकऱ्याला वार्षिक 12 हजार रुपये दिले. शेतकऱ्यांपुढं कांद्याचा मोठा प्रश्न आहेत. दुग्धव्यवसाय संकटात आहे. दुधावर 5 रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. दूध उत्पादक शेतकरी जगला पाहिजे. मी पोपटासारखा बोलत नाही, मी करून दाखवतो. तुम्ही कामाशी मतलब ठेवा. तुम्ही आशिर्वाद दिला आम्ही पुन्हा येऊ, असं अजित पवार म्हणाले. आज नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही, असंही अजित पवार म्हणालेय

अजित पवार काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये एका कार्यक्रमात म्हणाले होते की, तुम्ही जर गेल्या 30-35 वर्षांतील माझ्या गोष्टी ऐकल्या तर तुम्हालाही वाटेल की आता या लोकांनाही संधी दिली पाहिजे आणि या 80-85 वर्षांच्या लोकांनी आशिर्वाद देण्याचं किंवा सल्ला देण्याचं काम केलं पाहिजे.

अजित पवारांना काळे झेंडे
दरम्यान, मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी अजित पवार यांनी आपला जुन्रर दौरा रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली. मात्र अजित पवार यांनी मराठा समाजाची मागणी धुडकावून लावत दौऱ्यावर आले. त्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आणि अजित पवार यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले. मराठा आरक्षण लवकरात लवकर द्या, अशी घोषणाबाजी केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube