15 आमदार बाद झाल्यावर अजित पवार भाजपसोबत जाणार; ‘या’ व्यक्तीच्या दाव्याने खळबळ

15 आमदार बाद झाल्यावर अजित पवार भाजपसोबत जाणार; ‘या’ व्यक्तीच्या दाव्याने खळबळ

Anjali Damaniya On BJP and NCP Alliance :  सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या एक ट्विटमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणावरुन त्यांनी एक ट्विट केले आहे. अंजली दमानिया या सामाजिक कार्यकर्त्या असून त्या कायम भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत असतात. त्यांनी सामाजिक कार्यकर्ते  अण्णा हजारेंबरोबर भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन देखील केले होते. आता त्यांनी एक ट्विट करुन खळबळ उडून दिली आहे.

राज्यामध्ये लवकरच पंधरा आमदार बाद होणार आहेत व त्यानंतर अजित पवार हे भाजपसोबत जाणार आहेत, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये  म्हटले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली आहे. काल ज्यावेळी मी मंत्रालयात गेले होते तेव्हा एकाने मला हे सांगितले असे त्यांनी म्हटले आहे.

Gulabrao Patil : त्यांच्याकडे दुसरे भांडवलचं नाही, गुलाबराव पाटलांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहले आहे की, आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती त्यांनी दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, 15 आमदार बाद होणार आहेत, आणि अजित पवार भाजप बरोबर जाणार आहेत…. तेही लवकरच बघू…आणि किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

शंभूराज देसाईंची ठाकरेंवर खोचक टीका : म्हणाले, काका मला वाचवा…

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच अजित पवार हे नॉचरिचेबल झाल्याची बातमी आली होती. यावेळी त्यांच्यासोबत काही आमदार देखील आहेत, असे बोलले जात होते. यानंतर मात्र दुसऱ्या दिवशी अजित पवार यांनी माध्यमांसमोर येत आपली भूमिका स्पष्ट केली होती. मी कुठेही नॉचरिचेबल नव्हतो. माझी तब्येत बरी नसल्याने मी आराम करत होतो, असे ते म्हणाले होते.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube