Ramdas Athawale : राजकारणात काहीही होऊ शकतं, अजित पवार रिपाईंत आले तर त्यांना मुख्यमंत्रीपद देऊ

Untitled Design   2023 04 13T150853.004

काल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी ट्विट करत राज्याच्या राजकारणात एक खळबळ उडवून दिली. 15-16 आमदार लवकरच बाद होणार असून ते बाद झाल्यावर अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत भाजपसोबत जाणार असल्याचा दावा त्यांनी केला. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस मधील काही आमदार भाजपात येणार असल्याचे संकेत दिले. त्यामुळं राज्याच्या राजकारणात चर्चांना उधान आलं आहे. दमानिया यांच्या टि्वट संदर्भात आता अनेक प्रतिक्रिया येत आहेत. अशातच केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas athawale) यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार (Ajit Pawar) हे आमच्या पक्षात आलेतर मला आनंदच होईल, असं विधान त्यांनी केलं आहे.

आज रामदास आठवले हे भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या कुटुंबियांना सांत्वनभर भेट देण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना पत्रकारांनी अजित पवार हे भाजपता जाणार का, असं विचारलं होतं. त्यावर आठवलेंनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं. ते म्हणाले की, अजित पवार हे शरद पवारांचे पुतणे आहेत. शरद पवारांनी आजवर अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपदासह अनेक पदे दिली आहे. त्यामुळं ते भाजपमध्ये जाणार नाहीत. मध्यंतरी ते काही काळ नॉट रिचेबल होते. पण, त्याचं कारणही त्यांनी दिलं होतं. ते आजारी असल्यानं कुणाच्या संपर्कात नव्हते. फडणवीस आणि अजित पवार यांच्यात चांगले संबंध आहेत. त्यामुळं त्यांनी 2019 मध्ये महाविकास आघाडीतील नेत्यांना चकवा देत पहाटेचा शपथविधी घेतला होता. मात्र, आता तसं होणार नाही, असं मला वाटतं. दरम्यान, अजित पवार हे माझ्या पक्षात आले तर मला आनंदच होईल. ते माझ्या पक्षात आले तर त्यांना मंत्रीपद देण्याचा नक्की विचार करेन. माझ्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार नाही, कारण आमचे आमदार नाहीत. पण, राजकारणात काहीही होऊ शकतं. त्यामुळं आम्हाला मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली तर आम्ही अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची संधी देऊ, असं आश्वासन आठवले यांनी दिलं.

असद अहमदला पोलिसांनी कसं घेरलं?; 10 मुद्द्यांमध्ये जाणून घ्या Encounter ची इनसाईड स्टोरी

बाबरी मशीद पाडण्यात बाळासाहेब ठाकरेंचा आणि शिवसेनेचा काहीही संबंध नव्हता, असं वक्तव्य भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. याविषयी रामदास आठलेंना विचारले असता, त्यांनी सांगितले की, चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर भाष्य करण योग्य नाही, ते काय म्हटले हे मला माहित नाही, असं सांगत पाटलांच्या वक्तव्यावर हात झटकले.

काल दमानिया यांनी केलेल्या ट्विटवर बोलतांना अजित पवार यांनी उत्तर दिलं. एवढ्या मोठ्या व्यक्तीबद्दलम माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता, काय सांगणार, असं म्हणत अजित पवारांनी यावर अधिक बोलण टाळलं आहे. दरम्यान, अजित पवार हे भाजपसोबत जाणार का, हेच पाहणं महत्वाचं आहे.

 

 

Tags

follow us