Imtiaz Jalil : 5 लाख देऊन विषय संपवण्याचा प्रयत्न, पण विषय संपला म्हणून अजित पवारांच्या पक्षप्रवेशच्या बातम्या परवल्या

Imtiaz Jalil : 5 लाख देऊन विषय संपवण्याचा प्रयत्न, पण विषय संपला म्हणून अजित पवारांच्या पक्षप्रवेशच्या बातम्या परवल्या

Attempt to end the matter by paying five lakh rupees to the relatives of the deceased : रविवारी ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan) प्रदान करण्यात आला. मात्र, या सोहळादरम्यान रणरणत्या उन्हात जमलेल्या लाखो भाविकांपैकी 13 जणांचा उष्माघाताने (heat stroke) मृत्यू झाला, तर शेकडो जण आजारी पडले. यानंतर या कार्यक्रमाच्या जंगी आयोजनावर प्रश्न उपस्थित होऊ लागले. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या कार्यक्रमात उष्मादाहामुळे झालेल्या मृत्यूवरून सरकार टीकेचं धनी ठरत आहे. दरम्यान, आता खा. इम्तियाज जलील यांनी (Imtiaz Jalil) शिंदे-फडणवीस सरकारव जोरदार निशाणा साधला. सरकारने मृतांच्या नातेवाईंकाना पाच लाख रुपये देऊन विषय संपवण्याचा प्रयत्न केला, अशी टीका त्यांनी केली.

महाराष्ट्र पुरस्कार सोहळ्यात आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या अनेक अनुयायांचा उष्माघाताने बळी घेतला. त्यामुळं राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. विरोधकांनी सरकारवर पुरस्काराचं राजकारण केल्याचं आरोप केला. त्यानंतर शिंदे सरकारने मृताच्या नातेवाईंकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारने मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर केली, पण माणसांची किंमत पाच लाख रुपये होऊ शकत नाही, असा टोला सरकारला लगावला होता.

त्यानंतर आता इम्तियाज जलील यांनी यावर भाष्य केलं. जलील म्हणाले की, सरकारने मृतांच्या कुटुंबांना पाच लाख रुपये देऊन विषय संपवण्याच प्रयत्न केला. पण, अद्यापही हा विषय संपला नाही. त्यामुळं अजित पवार राष्ट्रवादीत नाराज असून ते राष्ट्रवादीला रामराम ठोकणार, अशी बातम्या परवल्या गेल्या. अजित पवार कुठं जाणार, किती आमदारांना सोबत घेऊन जाणार, या बातम्या पसरवल्या गेल्या. यामुळं 13 भाविकांच्या मृत्यूचा विषय बाजूला राहिला. अन् त्यावर पडदा पडला. सरकारच्या निष्क्रिय आणि असंवेदनशीलपणामुळं या 13 भाविकांनी आपला जीव गमावला. त्यामुळं त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला पाहिजे, असं जलील म्हणाले.

युवा सेनेचं मिशन पुणे, प्रत्येक कॉलेजमध्ये युवा सेनेचे कॉलेज कक्ष स्थापन करणार; वरुण सरदेसाईंची माहिती

जलील यांनी यावेळी बोलतांना सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. ते म्हणाले की, याआधी महाराष्ट्र भूषण हा कार्यक्रम कधी खुल्या मैदानावर झाला का? इतक्या लाखोंच्या संख्येने लोकांना कार्यक्रमाला बोलवण्याचं काय कारणं होतं? याआधी कधी सरकारने इतक्या मोठ्या संख्येने महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या सोहळ्याला बोलावलं होतं का? मला अशी माहिती मिळाली की, सरकारने या कार्यक्रमावर 13 कोटी रुपये खर्च केले. परंतु, या कार्यक्रमाचं आयोजन करतांना तिथल्या तापमानाची, हवामानाची माहिती सरकराने सरकारने घेतली नव्हती का? या भाविकांच्या मृत्यूची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल त्यांनी केला.

ते म्हणाले की, सत्ताधारी भाजप आणि शिवसेने या कार्यक्रमासाठी 20 लाख लोक जमा केले. त्याचा परिणाम काय झाला. तर 13 लोकांना आपला जीव गमवावा लागला. शेतकऱ्यांचं 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झालं. शेतकऱ्यांच्या फळं घेऊन आलेल्या गाड्या थांबल्या, भाज्यांच्या-दुधांच्या गाड्या थांबल्या. केवळ मतांच्या घाणरेड्या राजकारणासाठी हा कार्यक्रम केला होता. राज्यात आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे लाखो अनुयायी आहेत. त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन त्यांच्या अनुयायाच्या मतांचं राजकारण सरकारने केलं, असा आरोप जलील यांनी केला.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube