युवा सेनेचं मिशन पुणे, प्रत्येक कॉलेजमध्ये युवा सेनेचे कॉलेज कक्ष स्थापन करणार; वरुण सरदेसाईंची माहिती

राज्यात काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करून उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला होता. त्यामुळं शिवसेनेते दोन गट निर्माण झाले. यामध्ये शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना असं बोललं जाऊन लागलं. त्यानंतर राज्यात अनेक घडामोडी घडल्या. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदेंच्या बाजूने धनुष्यबाणाचा निर्णय दिला. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर राज्याचं राजकारण ढवळून निघालं. या सगळ्या घडामोडीनंतर ठाकरे गट चांगलाच अॅक्शन चांगलाच मोडमध्ये आला आहे. संघटनात्मक बांधणीसाठी युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांच्या नेतृत्वाखाली दोन दिवसापासून युवा सेनेचा पुणे शहर दौरा आयोजित केला होता. यावेळी प्रत्येक कॉलेजमध्ये युवा सेनेचे कॉलेज कक्ष स्थापन करणार असल्याचं सरदेसाई यांनी सांगितलं आहे.
ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख केल्याशिवाय महाराष्ट्राच्या राजकारण पूर्णचं होऊ शकत नाही. गेल्या पाच दशकांपासून या कुटुंबाने राज्याच्या राजकारणात सक्रिय भाग घेतला. मात्र, शिंदे यांच्या बंडाने शिवसेना खिळखिळी झाली आहे. त्यामुळं पुन्हा उभारी घेण्यासाठी ठाकरे गट चांगलाच अॅक्टीव झाला. ठाकरे गटाच्या युवा सेनेने पुणे शहराचा दौरा आयोजित केला. या दौऱ्यात सरदेसाई यांनी बोलतांना सांगितले की, आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली अनेक लोक आमच्याकडे येते आहेत. आम्ही प्रत्येक कॉलेजमध्ये युवा सेनेचे कॉलेज कक्ष स्थापन करणार आहोत. पुणे शहरातील तब्बल 25 कॉलेजमध्ये हे कक्ष स्थापन करणार आहोत. त्यामुळं प्रत्येक कॉलेजमध्ये युवा सेनेचे विद्यार्थी प्रतिनिधी असतील. युवा सेना तरुणांचे हक्काचे व्यासपीठ आहे. तरुणांचे-विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम युवा सेना करेल, असं त्यांनी सांगितलं.
Ram Shinde ; तथ्य नाही म्हणता मग स्पष्टीकरण द्यायला इतके दिवस का लागले?
या दौऱ्यादरम्यान, वरुण सरदेसाई यांनी पुणे विद्यापीठात जाऊन कुलगुरूंची भेट घेतली. या भेटीत विद्यार्थ्यांच्या प्रश्न सोडविण्यासाठी चर्चा झाली असून कुलगुरू विद्यार्थ्यांच्यचा प्रश्नावर मार्ग काढतील. फी वाढ संदर्भात आम्ही निवेदन दिले होते. त्यावरही कुलगुरु निर्णय घेतील, असं सरदेसाई यांनी सांगितलं. केवळ सरकार बदललं, पण, सरकार बदलून, बॅनर बदलून विद्यार्त्थ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. विद्यापीठात बदल होत असताना पालक आणि विद्यार्थ्यांना विश्वासात घेणे महत्त्वाचे आहे. त्यांना सगळी माहिती देणे महत्त्वाचे आहे. शिक्षण पद्धती बदलत आहे. अनेक प्रश्न आहेत, ते सोडवण्यासाठी युवा सेना बांधील आहे, असं ते म्हणाले.
यावेळी ते म्हणाले की, युवासेनेत स्थानिक पातळीवर अनेक बदल होणार आहेत. चांगलकाम करणाऱ्यांनाच युवा सेनेत प्राधान्य मिळेल.