खातेवाटपानंतर बावनकुळेंनी सांगितली पुढची रणनीती! म्हणाले, भविष्यात तिन्ही पक्षांची ताकद…

खातेवाटपानंतर बावनकुळेंनी सांगितली पुढची रणनीती! म्हणाले, भविष्यात तिन्ही पक्षांची ताकद…

नूकतचं राज्य सरकारकडून खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. राष्ट्रवादीचा अजित पवार गट सत्तेत सामिल झाल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले आहे. खातेवाटपाबाबतची यादी राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे पाठवण्यात आली होती. सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी खातेवाटप जाहीर केली आहे. त्यानंतर आता भाजपची पुढची रणनीती काय असणार? याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी भाष्य केलं आहे.

खलिस्तानी समर्थकांकडून सिडनीत भारतीय विद्यार्थ्याला लक्ष्य; लोखंडी रॉडने केली मारहाण

बावनकुळे म्हणाले, भविष्यात तिन्ही पक्षांची ताकद वाढणार असून आमचा स्ट्राईक रेट आम्ही 90 टक्के करण्याच प्रयत्न करीत असून कारण आम्ही 51 टक्क्याची संघटना बांधणी सुरु केली आहे. महाराष्ट्रातलं आणि देशातलं जे रॉकेट सरकार आहे. हे सरकार विकासाचे कामे रॉकेटच्या वेगाने करीत आहेत. ज्या आम्हाला जागा मिळतील, आमचा स्ट्राईक रेट आम्ही 90 टक्के ठेवणार असल्याचं बावनकुळेंनी स्पष्ट केलं आहे.

Nitesh Rane : राणेंनी दाखवला ‘तो’ जीआर; म्हणाले, आता पोहरादेवीची माफी कोण मागणार?

तसेच राष्ट्रवादी आणि शिवसेनेला ज्या जागा मिळणार आहेत, आणि आम्हाला मिळणाऱ्या जागांबाबत भाजपचे वरिष्ठ नेते निर्णय घेणार आहेत. आम्ही आमचा 90 टक्के रेट ठेऊन अधिकाधिक जागा निवडून आणणार असल्याचा विश्वास बावनकुळेंनी व्यक्त केला आहे.

OMG 2 Story Leak: अक्षय कुमारच्या ‘OMG 2’ची कथा झाली उघड; वाचा, काय आहे भानगड?

आगामी निवडणुकीत जेवढी ताकद आम्ही भाजपच्या उमेदवारांसाठी लावू तेवढीच ताकद आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. आगामी निवडणुकीत भाजपसह राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उमेदवारांचीही ताकद आम्हाला मिळेल, अशी योजना आम्ही आखत असल्याचं बावनकुळेंनी स्पष्ट केलं आहे.

उद्धव ठाकरेंवर टीका :
उद्धव ठाकरे कोणत्या मानसिकतेने बोलत आहेत, हे सर्वांना माहित आहे. फडणवीस यांनी काल पौराणिक ग्रंथाचे दाखले दिले. जो आपल्याशी दगाबाजी करतो त्याला जागा दाखवावी लागते. काल फडणवीस यांनी केलेले वक्तव्य अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यात सत्यताही आहे. भाजपची भावनिक युती शिवसेनेसोबत आहे आणि राष्ट्रवादीसोबत आमची राजकीय युती आहे.
उद्धव ठाकरे यांना ज्यांनी सोडलं, ते आमच्याकडे आले हे बेरजेचे राजकारण आहे.

Shah Rukh Khan: चाहत्याने विचारला भन्नाट प्रश्न; उत्तर देताना शाहरुख म्हणाला,’तुमचा पगार…’ 

अर्थसंकल्प मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिघे मिळून अर्थसंकल्प तयार करतील. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या बद्दल मी बोलणं योग्य नाही. त्यांच्या पक्षाने कुणाशी युती करावं, कसं राजकारण करावे तो त्यांचा अधिकार आहे. उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रिपद गेल्यामुळेपद फडणवीस यांच्यामुळे गेले असं वाटत आहे. मात्र, आता उद्धव ठाकरे यांनी स्वप्नातून बाहेर निघावे. ते आता मुख्यमंत्री नाहीत आणि भविष्यात होतील का? हेही माहित नाही. ज्याला घर सांभाळता येत नाही ते कधीच मोठे होऊ शकत नाहीत. त्यांचे पद गेल्यामुळे ते निराश झाले असल्याचं ते म्हणाले आहेत.

दरम्यान, आगामी काळात तिन्ही पक्षांची ताकद एकमेकांच्या उमेदवारांना मिळणार असून दोन वेगवेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र आले तर राज्याचंच भलं होणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube