दिल्ली पोलिसांनी प्रत्येक दगड उचलला, त्यावरील फिंगरप्रिंट आधारशी लिंक होतील… चंद्रकांत पाटलांचं सूचक विधान

दिल्ली पोलिसांनी प्रत्येक दगड उचलला, त्यावरील फुटप्रिंट आधारशी लिंक होतील, असं सूचक विधान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय.

Untitle (3)

Minister Chandrakant Patil : दिल्ली पोलिसांनी प्रत्येक दगड उचलला, त्यावरील फिंगरप्रिंट आधारशी लिंक होतील, असं सूचक विधान राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी (Minister Chandrakant Patil) केलंय. ते कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांना दिल्लीतील विद्यार्थ्यांचं आंदोलन, कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांवर माध्यमांकडून सवाल करण्यात आले आहेत.

मला भाजपकडून अनेक ऑफर्स अन् धमक्याही आल्या; अभिजीत दिपकेंच्या दाव्यावर भाजपचं प्रत्युत्तर…

पुढे बोलताना मंत्री चंद्रकात पाटील म्हणाले, दिल्ली पोलिसांनी फार मोठा रिपोर्ट तयार केला आहे. तो पाहिला तर आपल्याला चक्कर येईल. ज्यांना पकडलं ते कोणकोणत्या गुन्ह्याहत होते त्याचे पोलिसांनी विश्लेषण केलं आहे. पोलिसांनी सांगितलं की तिथं पडलेला प्रत्येक दगड उचलेला आहे. त्या दगडावर असणारे फुट प्रिंट आधारशी लिंक होतील, असं पाटील म्हणाले आहेत.

तसेच चंद्रकात पाटील यांना खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांवरही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना ते म्हणाले, लोकशाहीच्या ब्युटीत तुम्ही आरोप करु शकता, राहुल गांधी तर लोकसभेचे विरोधीपक्षनेते आहेत. आरोप केले म्हणजे ते सर्व खरं असतं असं नाही, असं उत्तर चंद्रकातं पाटील यांनी राहुल गांधी यांच्या आरोपावर दिलं आहे. एका बाजूने राहुल गांधी हे अमित शहा यांनी लाठीचार्ज करायला लावला असा आरोप करत आहेत. तर दुसऱ्या बाजूने पोलिसांनी त्यांच्या अॅडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आकडेवारी दिली आहे. याबाबत पोलिसांना देखील ते सिद्ध करावं लागेल आणि राहुल गांधी यांना देखील त्यांचे आरोप सिद्ध करावे लागणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

commonwealth Games : महाराष्ट्राच्या दिलीप गावितची ‘सुवर्ण’ कामगिरी…पदक पटकावणारा पहिला पुरुष ठरला!

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी गृहमंत्रालय परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरलं का याबाबत विचारलं असता त्यांनी परदेशातील मदत आणि काही बॅड एलिमेंट या आंदोलनात होते अशी माहिती असल्यामुळेच आपण व्यवस्थित सर्व गोष्टी हाताळत होतो. जोपर्यंत संसदेकडे गेले नाहीत तोपर्यंत त्यांना कोणी काही केलं नव्हतं. पण ज्यावेळी ते संसदेकडे निघाले हे कळालं अन् ते संसदेत घुसले असते तर काय स्थिती निर्माण झाली असती याचा विचार तुम्ही करा असं उत्तर त्यांनी दिलं.

follow us