किती हा ढोंगीपणा म्हणत चंद्रकांत पाटलांच्या मतदारसंघात राष्ट्रवादीची बॅनरबाजी

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 28T125126.416

भाजपचे नेते व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोथरुड विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे बॅनरबाजी करण्यात आली आहे. यावर ज्या-ज्या भाजप नेत्यांनी आक्षेपार्ह विधाने केली आहेत त्यांचे फोटो लावण्यात आले आहेत. थेट पालकमंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये बॅनर लावल्याने यानंतर आता भाजप देखील आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने ओबीसींच्या अवमानाच्या मुद्द्यावरून भाजपाला पोस्टरद्वारे खडे बोल सुनावले आहेत.  हिम्मत असेल तर महाराष्ट्रातील महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांवर आगोदर कारवाई करा, असे या पोस्टरवर लिहिण्यात आलेले आहे. तसेच  क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा अवमान करणाऱ्यांना पाठीशी घालणारे आता ओबीसींच्या मानापनाच्या गोष्टी करणार? असा प्रश्न देखील या बॅनरवरुन विचारण्यात आला आहे.

Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण

हा ढोंगीपणा बास करा? महाराष्ट्रातला ओबीसी तुमच्या या भूलथापांना बळी पडणार नाही,असेही या बॅनरवर म्हटले आहे. गिरीश गुरनानी या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोथरुड विधानसभा अध्यक्षाने हे बॅनर लावले आहेत. या पोस्टरवरुन त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

शिरसाटांना ‘ते’ वक्तव्य भोवणार.. दानवे म्हणाले, आता थेट गुन्हा दाखल करणार

दरम्यान, राहुल गांधी यांनी मोदी समाजाविषयी वक्तव्य केल्याने त्यांनी ओबीसी समाजाचा अपमान केला आहे, असे भाजपने म्हटले आहे. मोदी समुदायाला चोर म्हटल्या प्रकरणी गुजरात न्यायालयाने राहुल गांधींना 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यानंतर लोकसभेच्या सचिवालयाने त्यांची खासदारकी रद्द केली आहे. या सगळ्या प्रकरणावरुन राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाची माफी मागावी, यासाठी भाजपने आंदोलन केले आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने बॅनरबाजी केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube