फडतूस, काडतूस अन् आता कुचका मेंदू; फडणवीस हे काय बोलून गेले!

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 05T134547.421

Devendra Fadanvis On Sawarkar :  राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. यावेळी ते नागपूर येथे सावरकर गौरव यात्रेत बोलत होते. सावरकर गौरव यात्रा ही काल नागपूर येथे पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

ठाकरे गटाकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्यात यावा यावरुन भाजपवर टीका करण्यात येते. या त्यांच्या मुद्द्यावरुन फडणवीसांनी भाजपला सुनावले आहे. यांच्याकडे एकच मुद्दा आहे, तो म्हणजे सावरकरांना भारतरत्न द्या. सावरकर हे भारतरत्न आहेतच. सावरकरांना भारतरत्न मिळायचा तेव्हा मिळेलच, असे ते म्हणाले आहेत.

Fadnavis Vs Thackeray : ‘फडतूस’ शब्दांचा अर्थ राऊतांनी सांगितला, पण खरा अर्थ काय?

आज देशामध्ये अनेल लोक असे आहेत की ज्यांना भारतरत्न मिळालेला नाही. महात्मा ज्योतिबा फुलेंना अजून भारतरत्न मिळालेला नाही. सावरकरांना भारतरत्न जरुर मिळेल पण तुमच्यासारख्या कुचक्या लोकांच्या मेंदूला सरळ केल्यानंतर सावरकरांना भारतरत्न मिळेल, अशा शब्दात फडणवीसांनी विरोधकांवर तोफ डागली आहे.

Fadnavis Vs Thackeray : ‘फडतूस’ शब्दांचा अर्थ राऊतांनी सांगितला, पण खरा अर्थ काय?

त्यांच्या या टीकेनंतर कुचका मेंदू अशी टीका त्यांनी नेमकी कुणावर केली यावर आता चर्चा सुरु झाली आहे. नेमकी ही टीका उद्धव ठाकरेंवर होती की आणखी कुणावर हा प्रश्न उपस्थित झाला आहे.  दरम्यान, यावेळी त्यांनी राहुल गांधींवरही टीका केली आहे. राहुल गांधी म्हणाले की माफी मागायला मी सावरकर नाही. पण सावरकर होण्यासाठी मोठा त्याग करावा लागतो. सावरकरांना ज्या छोट्याशा खोलीत  डांबल होतं त्याच ठिकाणी राहुल गांधींना मी एसी लावून देतो त्यांनी एक रात्र राहुन दाखवावं, असं खुलं आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.

Tags

follow us