राऊतांनी अबु आझमींवर थुंकावे; नितेश राणेंची खोचक टीका
Nitesh Rane On Sanjay Raut : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात काल कोल्हापूर येथे झालेल्या आंदोलनातील दगडफेकीवरुन राणेंनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हल्ला चढवला आहे. या नेत्यांना दंगल होणार, हे आधीच कसे कळले होते, असा प्रश्न राणेंनी उपस्थित केला आहे.
काही महिन्यांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्रात दंगली होणार असे वक्तव्य केले होते. कोल्हापूरच्या काँग्रेसच्या नेत्याने देखील काही दिवसांपूर्वी दंगली होणार असे वक्तव्य केले होते. मणीपूरवर अग्रलेख लिहिण्यापेक्षा या नेत्यांना विचारा असे म्हणत त्यांनी राऊतांना सुनावले. जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात 400 लोकांना धर्मांतर करण्यापासून वाचवले, असा दावा राणेंनी केला आहे. याबद्दल अग्रलेख लिहा. औरंगजेबावर कुणाचे प्रेम आहे, हे आम्हाला सांगायची गरज नाही, असे म्हणत त्यांनी राऊतांना सुनावले आहे.
Jitendra Awhad ‘….तर एखाद्या जंगलामध्ये वणवा पेटावा तसा महाराष्ट्र पेटेल’ : आव्हाडांचा गंभीर इशारा
तसेच अबु आझमीने औरंगजेबाला मी मानतो असे वक्तव्य केले. जर खरा मर्द असशील तर अबु आझमीवर थुंकून दाखव, असे वक्तव्य केले. दंगल भडकण्याची माहिती मुंब्र्याच्या आमदाराला व काँग्रेसच्या नेत्याला माहिती कशी पडली, अशा शब्दात राणेंनी मविआच्या नेत्यांवर निशाणा साधला.
Rahul Narvekar : लवकरच क्रांतीकारी निर्णय घेणार; नार्वेकरांच्या वक्तव्याने खळबळ
काल नंदकिशोर चतुर्वेदीच्या प्रॉपर्टीवर रेड पडल्या आहेत. मातोश्री 2 चा खरा मालक चतुर्वेदी आहे. याला ठाकरेंनी लपवले आहे. राऊतांनी अग्रलेखातून सांगावे की, चतुर्वेदींनी कुणाचे खोके ठेवले. मागच्यावेळेला जेव्हा रेड पडली होती तेव्हा उद्धव ठाकरेंच्या मेव्हणे हे ऑस्ट्रेलियाला पळून गेले, असा आरोप राणेंनी केला.