Video : ‘रोहित पवारांना ठाकरेंचा गुण लागला’; भाजपकडून व्हिडीओ व्हायरल

Video : ‘रोहित पवारांना ठाकरेंचा गुण लागला’; भाजपकडून व्हिडीओ व्हायरल

BJP Attack On Rohit Pawar :  राज्यामध्ये पोलिसांची कंत्राटी भरती करण्यावरुन विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला होता. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी यावरुन सरकारा धारेवर धरले होते. राज्य सरकार हे अग्नीवीरचा छोटा भाऊ राज्यात जिवंत करताय का? असा प्रश्न उपस्थित करत रोहित पवारांनी राज्य सरकारवर निशाणा साधला होता. यानंतर विधानसभेत उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत राज्यामध्ये कंत्राटी पद्धतीने पोलीस भरती होणार नसल्याचे स्पष्ट केले.

यावर आता भाजपकडून एक व्हिडीओ जारी करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून रोहित पवारांवर निशाणा साधण्यात आला आहे. तसेच रोहित पवारांना उध्दव साहेबांच्या सहवासात राहून वाण नाही तर गुण लागला, असे कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आले आहे.

LetsUpp Special : पवार पुन्हा भिजणार की ठाकरे डरकाळी फोडणार ?

 

व्हिडीओमध्ये काय म्हटले आहे?

रोहित पवार तुम्हाला माजी मुख्यमंत्र्यांसोबत राहून अल्जायमर झालाय की काय असाच प्रश्न निर्माण झालाय. तुम्ही अधिवेशनात पोलीस भरती कंत्राट पद्धतीने भरण्याबाबत निषेध व्यक्त केला. त्यावेळी राज्याबाबत काळजी सुद्धा व्यक्त केली. खरं तर कौतुकच आहे. पण का हो रोहित पवार ही काळजी तुम्ही तुमच्या हातात अडीत वर्षे सरकार असताना का नाही घेतली. महाविकास आघाडी सरकारच्या काळातच पोलीस भरती कंत्राटी पद्धतीने करण्यासंदर्भात टेंडर निघाले होते. हे तुम्हाला माहित नव्हतं, की लक्षात नव्हतं.

‘कुणी आमच्याकडं आलं तर आमचा दुपट्टा तयार’, बावनकुळेंकडून नव्या इनकमिंगचे संकेत

रोहित पवार काय म्हणाले होते?

ही प्रथा म्हणून अतिशय चुकीची आहे. एकदा कंत्राट भरती सुरु झाल्यावर थांबवता येत नाही. पोलीस प्रशासनामध्ये कंत्राट भरती होणं हे लोकांसाठी, पोलीस प्रशासनासाठी व युवांसाठी घातक आहे. तुम्हाला तात्पुरते लोकं घ्यायचे असतील तर तुम्ही होमगार्ड घेऊ शकता. यामुळे राज्य सरकार हे अग्नीवीरचा छोटा भाऊ राज्यात जिवंत करताय का? असा प्रश्न उपस्थित राहत आहे

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube