भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रातील चौघांना संधी; नितीन नबीन यांची घोषणा!

BJP OBC Morcha Maharashtra Appointments: भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची नवी यादी जाहीर करण्यात आली आहे.

BJP OBC Morcha Maharashtra Appointments: भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची नवी यादी जाहीर करण्यात आली आहे.

BJP OBC Morcha Maharashtra Appointments: भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची नवी यादी जाहीर करण्यात आली आहे. या नव्या नियुक्त्यांमध्ये महाराष्ट्रातील चार जणांना संधी मिळाली आहे. बबनराव चौधरी (Babanrao Chaudhary) यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून, राहुल केंद्रे यांची राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड झाली आहे. तसेच मुंबईतील हर्षदा फरांदे आणि स्मिता काळे यांनाही राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान देण्यात आलं आहे.

बारामतीत गोळीबार; इन्स्टाग्रामवरून मागितली 2 लाखांची खंडणी, नेमकं प्रकरण काय?

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन (Nitin Nabin) यांनी शनिवारी (22 नोव्हेंबर) या नियुक्त्यांची घोषणा केली. सर्व नियुक्त्या तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय उपाध्यक्ष, महामंत्री, मंत्री, कोषाध्यक्ष यांसह विविध पदांवर नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

ओबीसी मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी सात जण

भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी सात जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये आसामचे जोगेन मोहन, ओडिशाच्या ममता मोहंता, उत्तर प्रदेशचे संगम लाल गुप्ता आणि संगीता बलवंत बिंद, महाराष्ट्राचे बबनराव चौधरी, दिल्लीचे सत प्रकाश राणा आणि बिहारचे अर्जुन सहानी यांचा समावेश आहे.

पुण्यात पुन्हा अतिक्रमण केल्यास दुकानं, हॉटेल कायमची सील होणार; महापालिका आयुक्तांचा कडक इशारा

तर राष्ट्रीय महामंत्रीपदी गजेंद्र यादव (दिल्ली), प्रमोद मधवाराज (कर्नाटक) आणि ललित चंद्राकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय राष्ट्रीय सचिव, कोषाध्यक्ष, मीडिया आणि सोशल मीडिया संयोजकांसह विविध पदांवरही नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

युझवेंद्र चहलच्या नियुक्तीचीही चर्चा

या नव्या यादीत क्रिकेटपटू युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याच्या नावाचाही समावेश आहे. चहल याची भाजप ओबीसी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळासह क्रीडा क्षेत्रातही या नियुक्तीची चर्चा होत आहे.

 

follow us