डोकं खात राहा म्हणजे कामे होत राहतील; CM फडणवीसांचा आमदारांना मिश्किल सल्ला
कामासाठी डोक खाल्ले नाही तर शासन लक्ष देत नाही. त्यामुळे सर्व डोके खात राहा, म्हणजे कामे होत राहील, असा मिश्किल सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलायं.
Cm Devendra Fadanvis : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह आमदार कृष्णा खोपडे, आमदार मोहन मते सतत शहराच्या विकासासंबंधी निधीसाठी माझे डोके खातातच. ही बाब चांगली आहे. कामासाठी डोक खाल्ले नाही तर शासन लक्ष देत नाही. त्यामुळे सर्व डोके खात राहा, म्हणजे कामे होत राहील, असा मिश्किल सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी नागपुरातील आमदारांना दिला आहे. नागपुरात महापालिकेच्या एका कार्यक्रमाप्रसंगी फडणवीसांनी आमदारांना सूचना केली आहे.
रक्षकच बनले भक्षक! पुण्यात तोतया पत्रकार, महिला पोलिस आणि पोलिस नाईक यांचा एक कोटींच्या दरोड्याचा कटa>
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या सूचनेनंतर हा तर्क विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या निकालाशी जुळवत अनेकांनी आश्चर्यच व्यक्त केले आहे. नागपूर महापालिकेच्यावतीने 579 कर्मचाऱ्यांनी नियुक्ती पत्र वितरणे करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर निता ठाकरे होत्या.
आज एकूण 579 उमेदवारांना थेट नियुक्तीपत्रे देण्यात आली, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नाला न्याय मिळाल्याचे समाधान आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात आज प्रथमच लाड-पागे समितीच्या शिफारशींनुसार नियुक्त्या देण्यात आल्या. यामध्ये सफाई कर्मचाऱ्यांसाठी वारस पद्धती लागू करून पात्र सुशिक्षित तरुणांना वर्ग-3 पदांवर नियुक्ती देण्यात आली. सफाई कर्मचाऱ्यांना किमान वेतनानुसार वेतन मिळावे, यासाठी शासनाने निर्णय घेतला. त्यानंतर अधिसंख्य पदांना मान्यता देऊन राज्यभर हजारो कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्यात आली असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहेत.
टॉपमधील नऊ कंपन्यांचे मार्केट कॅप पावणे तीन लाख कोटींनी घटले, कोणत्या कंपन्यांना बसला झटका ?
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या भाषणातून नेहमीच सरकारचे निर्णय, विकासकामे, योजनांची आकडेवारी आदीबाबत माहिती देत असतात. शासकीय कार्यक्रमातून ते नेहमीच ते प्रशासनाला सूचना देखील करतात. काल त्यांनी आमदारांना मिश्किलपणे थेट अशी सूचना केल्याने एकच चर्चा रंगली.