‘हा एकाधिकारशाही, हुकूमशाहीचा पराभव’, आमदार पात्रतेच्या निकालानंतर CM शिंदेची प्रतिक्रिया
Eknath Shinde on Shiv Sena MLA disqualification : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी आज शिवसेना आमदार अपात्रता (Shiv Sena MLA disqualification) प्रकरणाचा निकाल जाहीर केला. एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी असल्याचे सांगत त्यांनी ठाकरे गटाच्या सर्व याचिका फेटाळून लावल्या. एवढेच नाही तर शिंदे गटाचे आमदारही पात्र ठरवले. विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावर प्रतिक्रिया दिला आहे. अखेर सत्याचा विजय झाला, लोकशाही आणि हिंदुत्वाचा विजय झाला, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले. एकाधिकारशाही, घराणेशाही, मक्तेदारी याला चपराक मिळाली, असं शिंदे म्हणाले.
गोगावले व्हिप ते शिंदेंची नियुक्ती; SC चं अवैध राहुल नार्वेकरांनी वैध ठरवलं…
ते म्हणाले, लोकशाहीत कोणालाही पक्ष संघटना ही मालमत्ता मानून मनमानी निर्णय घेता येणार नाही, हे सिध्द झालं. भरत गोगावले यांना मुख्य प्रतोद म्हणून तसंच शिवसेना खरी कोणाची याला देखील मान्यता देण्यात आली आहेस, असं शिंदे म्हणाले. आजचा हा निर्णय स्वागतार्ह आहे. हा निर्णय म्हणजे, सत्याचा विजय आहे. लोकशाही, बाळासाहेबांच्या आणि आनंद दिघे यांच्या विचारांचा विजय आहे. हा राज्यातील सर्वसामान्य माणसांचा, शिवसैनिकांचा विजय असून या निकालामुळं एकाधिकारशाही, हुकुमशाहीचा पराभाव झाला, असं शिंदे म्हणाले.
नार्वेकरांनी दिलेला निकाल हा दिल्लीतील गुजरात लॉबीने लिहून दिलेला ड्राफ्ट; पटोलेंची सडकून टीका
उद्धव ठाकरेंनी यांनी मॅच फिक्सिग असल्याचं निकालावर म्हटलं आहे. त्यावरही एकनाथ शिंदेंनी भाष्य केलं. निकाल बाजूने आला तर तो मॅच फिक्सिंग नाही आणि मेरीटवर निकाल येतो, तेव्हा मॅच फिक्सिंग. निकाल विरोधात गेला तर ते निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाला सल्ला देतात. त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार? 2019 मध्ये शिवसेना-भाजप युती म्हणून निवडून दिलं होतं. मात्र, लग्न एकासोबत अन् संसार दुसऱ्यांबरोबर थाटला होता. ज्यांनी मतदान केलं, त्यांच्याशी विश्वासघात केला होता. 2019 मध्ये ठाकरेंनी लोकशाहीचा गळा घोटला होता. अशी टीकाही शिंदेंनी केली. दुसऱ्यांवर आरोप करण्यापूर्वी त्यांनी एकदा स्वत: आरशात पहावं, असा टोलाही शिंदेंनी लगावला.
सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार सर्वांना आहे. विजयाचे श्रेय बहुमताला देणार. लोकशाहीत बहुमत महत्वाचं असतं, असंही शिंदे म्हणाले.