Devendra Fadanvis : हिंदूत्त्व आणि सत्यासाठी संघर्ष करणार्‍या एकनाथरावांचे अभिनंदन !

Devendra Fadanvis : हिंदूत्त्व आणि सत्यासाठी संघर्ष करणार्‍या एकनाथरावांचे अभिनंदन !

मुंबई : ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर वाटचाल करीत हिंदूत्त्व आणि सत्यासाठी संघर्ष करणार्‍या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना शिवसेना पक्ष हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्याबद्दल मी त्यांचे आणि राज्यातील तमाम शिवसैनिकांचे मनापासून अभिनंदन करतो. ‘अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे शिवसेना पक्ष हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

केंद्रीय निवडणूक निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना दिलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतचा आदेश दिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा झटका बसला आहे. जूनमध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडाला भाजपने साथ दिली. शिंदे यांचा वापर करून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला कोंडीत पकडले. आता पक्ष आणि चिन्ह हे दोन्ही शिंदेंकडे गेल्याने ठाकरे यांन राजकीयदृष्ट्या धक्का देण्यात भाजपला यश आले आहे. राजकीयदृष्ट्या बुलडोझरच फिरविण्यात आल्याची प्रतिक्रिया समोर आली आहे.

शिवसेना आणि धनुष्यबाण दोन्ही एकनाथ शिंदे गटाचे : भाजपने ठाकरेंना पॉलिटिकली चिरडले

राज्याच्या राजकारणात आठ महिन्यांपूर्वी सर्वात मोठा भूकंप आला होता. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षात 40 आमदारांच्यासोबत बंडखोरी केली होती. एकनाथ शिंदे सर्व बंडखोर आमदारांना आपल्यासोबत घेऊन सूरत, त्यानंतर गुवाहाटीला गेले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत जाऊन राज्यात नवं सरकार स्थापन केलं होते. दरम्यान, सत्तास्थापनेनतंर शिवसेना कुणाची? हा वाद उफाळून आला होता. या निर्णयावर शिवसेनेने आक्षेप घेतला असून सत्यमेव जयते ऐवजी असत्यमेव जयते, असे म्हणावेसे वाटते, अशी प्रतिक्रिया पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.

त्यानंतर ठाकरे गट केंद्रीय निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात गेला होता. गेल्या आठ महिन्यांपासून याबाबत सुनावणी सुरु होती. निवडणूक आयोगात याबाबतचा युक्तिवाद पूर्ण झालेला होता. त्यानंतर कधीही निकाल येणं अपेक्षित होतं. त्यानुसार आज संध्याकाळी निवडणूक आयोगाकडून निकाल जाहीर करण्यात आलाय. या निकालामुळे शिवसेना कुणाची याचा निर्णय अखेर झाला. केंद्रीय निवडणूक आयोगाने अखेर आपला निर्णय जाहीर केला. या निकालात केंद्रीय निवडणूक आयोगात शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळेल, असं स्पष्ट लिहिलं आहे.दरम्यान, निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीवर काय परिणाम होणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube