कॉंग्रेसची पहिली यादी जाहीर, फडणवीसांना टक्कर देण्यासाठी तगडा उमेदवार रिंगणात…

  • Written By: Published:
कॉंग्रेसची पहिली यादी जाहीर, फडणवीसांना टक्कर देण्यासाठी तगडा उमेदवार रिंगणात…

Congress Candidate List : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठ (Assembly Elections)भाजपने रविवारी (20 ऑक्टोबर) पहिली यादी जाहीर केली. त्यानंतर आता काँग्रेसने (Congress) आपली पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण 48 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. या यादीत देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) विरोधात प्रफुल्ल गुडधेंना (Praful Gudadhe) उमेदवारी देण्यात आली.

Assembly Election : शरद पवारांकडून किती नव्या चेहऱ्यांना संधी, किती महिला निवडणुकीच्या रिंगणात? 

महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, शरद पवार गट आणि ठाकरे गट यासह इतर मित्रपक्षांचा समावेश आहे. महाविकास आघाडीच्या कालच्या बैठकीत तिन्ही पक्षांकडून 85-85 उमेदवार असतील, अशी घोषणा करण्यात आली होती. त्यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेकडून 65 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. यानंतर आज काँग्रेसने आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

स्थावर, जंगम, बॅंक ठेवी अन् शेअर्स; छगन भुजबळांच्या संपत्तीचा आकडा समोर 

यामध्ये अक्कलकुवा येथील के. सी. पाडवी, शहादामधून राजेंद्र गावित, धुळे ग्रामीणमधून कुणाल पाटील, नंदुरबारमधून किरण तडवी, रावेरमधून धनंजय चौधरी, मलकापूरमधून राजेश एकडे, नवापूरमधून शिरीषकुमार नाईक, चिखलीतून राहुल बोंद्रे यांनी उमेदवारी दिली.

नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघ हा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदार संघ आहे. या  मतदारसंघात महाविकास आघाडीकडून कोण लढणार? यावर अनेक तर्क-वितर्क लावले जात असतांना  कॉंग्रेसने प्रफुल्लगुडधेंसारखा तगडा उमेदवार रिंगणात उतरवा. त्यामुळं भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या या मतदारसंघाकड संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं.

कोण आहेत गुडधे?
प्रफुल्ल गुडधे हे राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. ते नागपूर महापालिकेत दीर्घकाळ नगरसेवक होते आणि विरोधी पक्षनेतेही होते. पक्षाच्या विविध मोहिमा आणि उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. पक्षातील सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या जवळच्या लोकांमध्ये त्यांचा समावेश होतो.

दरम्यान, काँग्रेसच्या या यादीत काही ठिकाणी विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली. तर काही ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. या यादीत काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्या नावाचाही समावेश आहे. याशिवाय विलासराव देशमुख यांचे दोन्ही पुत्र धीरज विलासराव देशमुख आणि अमित विलासराव देशमुख यांनाही लातूरमधून तिकीट देण्यात आले आहे.

दक्षिण कराडमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर पलूस-काडेगावमधून डॉ. विश्वजित पतंगराव कदम यांनाही उमेदवारी देण्यात आली.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube