‘जयंतराव म्हातारी मेल्याचं दु:ख तर आहेच पण..,’; विदर्भाच्या मुद्द्यावरुन फडणवीसांची टोलेबाजी
Devendra Fadnvis On Jayant Patil : जयंतराव म्हातारी मेल्याचं दु:ख तर आहेच पण काळ सुखावतोयं याचं जास्त दु:ख असल्याचं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर टोलेबाजी केली आहे. दरम्यान, विदर्भाच्या प्रश्नांवरुन विरोधकांनी आज सत्ताधाऱ्यांना चांगलच कोंडीत पकडल्याचं दिसून आलं. अंतिम आठवडा प्रस्तावादरम्यान चर्चेदरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी मिश्किल अंदाजात जयंत पाटलांवर टोलेबाजी केली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, नाना पटोले हे विदर्भातील आहेत. तुम्ही असताना विदर्भाचा प्रस्ताव येईल, अशी अपेक्षा आहे. उद्धव ठाकरे जरी सभागृहात बोलत नसले तरीही ते माध्यमांसमोर बोलले नाही की विदर्भावर चर्चा झाली पाहिजे, पण तुम्हीही प्रश्न उपस्थित नाही केले. विरोधकांना विदर्भाचा सपशेल विसर पडला हे चिंताजनक बाब आहे. अंतिम आठवडा प्रस्ताव विरोधकांनी मांडायचा असतो हा त्यांचा अधिकार, नाना पटोलेंनी प्रस्ताव मांडू दिला पाहिजे होता पण विजय वडेट्टीवारांवर अन्याय केला जातोयं, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
‘मिमिक्री एक कला, धनखड यांचा अपमान करण्याचा हेतू नव्हता; कल्याण बॅनर्जींची स्पष्टोक्ती
विदर्भाचे प्रश्न अधिवेशनात मांडण्यासाठी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी विरोधकांकडून केली जात होती. सत्ताधारी सरकारला विदर्भाच्या प्रश्नांचं देणघेणं नसल्याचा आरोपही विजय वडेट्टीवारांकडून करण्यात आला होता. त्यामुळे आज अधिवेशनात विदर्भाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळालं आहे.
विदर्भाच्या प्रश्नांवरुन जयंत पाटील म्हणाले, विदर्भातील प्रश्न सत्ताधाऱ्यांकडून मांडले जावेत हे अपेक्षित मात्र, तसं झालं नाही. त्यातील काही मुद्दे सत्ताधाऱ्यांनी समोर आणले आहेत. त्यामुळे आम्ही विदर्भाच्या प्रश्नावरुन अधिक बोललो नसल्याचं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिलं होतं. त्यावर बोलताना फडणवीस यांनी जयंत पाटलांनी टोला लगावला आहे.
दुसऱ्या वनडेत टीम इंडियाची फलंदाजी ढेपाळली… आता गोलंदाजांवर मदार
काय म्हणाले होते जयंत पाटील?
सत्ताधाऱ्यांनी विदर्भाचा प्रश्न मांडला म्हणून मांडला नाही. काल अर्थमंत्री अजित पवार म्हणाले की ,आम्ही हा प्रस्ताव वेळ नसेल तर विड्रॉल करतो. अद्याप अधिवेशन संपलं नाही त्यामुळे आजही अधिवेशन आहे असं गृहित धरुन आम्ही सगळे बसत आहोत. आता चर्चा होणारच आहे सभागृहात तुम्ही प्रश्न मांडला काय आम्ही मांडला काय? दहा दिवस अधिवेशन घ्यायचं आणि तिकडून दोन प्रस्ताव, इकडून एक असं लिमिटेड काळ होता. म्हणूनच आम्ही म्हणत होतो की, एक महिना अधिवेशन घ्या. नागपूरची हवा आम्हाला जास्ती दिवस द्या, असं जयंत पाटील म्हणाले होते.