दुसऱ्या वनडेत टीम इंडियाची फलंदाजी ढेपाळली… आता गोलंदाजांवर मदार
Ind Vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND Vs SA) यांच्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना आज सेंट जॉर्ज पार्क, गाकबेर्हा येथे खेळवला जात आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने (Adam Markram) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडिया 46.2 षटकात 211 धावांपर्यंत पोहचली. आफ्रिकेला विजयासाठी 212 धावांचे आव्हान दिले आहे.
भारताकडून साई सुदर्शन आणि केएल राहुल यांनी अर्धशतकं झळकावली. दक्षिण आफ्रिकेकडून वेगवान गोलंदाज नांद्रे बर्गरने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर ब्युरॉन हेंड्रिक्स आणि केशव महाराज यांनी 2-2 विकेट घेतल्या. केशव महाराज आणि लिझाड विल्यम्स यांना 1-1 विकेट घेतली.
साई सुदर्शनने अर्धशतक ठोकून इतिहास रचला
साई सुदर्शन 83 चेंडूत 62 धावा करून बाद झाला. या अर्धशतकासह त्याने एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. पदार्पणानंतर सलग दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये अर्धशतक ठोकणारा सुदर्शन दुसरा भारतीय ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम नवज्योत सिंग सिद्धू (73 आणि 75) यांच्या नावावर होता. यापूर्वी सुदर्शनने नाबाद 55 धावा केल्या होत्या.
LPG Price : 450 रुपयांना एलपीजी सिलिंडर मिळणार? राजस्थानमध्ये घोषणा अन् संसदेत नकार
दरम्यान, केएल राहुलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिला सामना 8 गडी राखून जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. T20 क्रिकेटमध्ये दमदार प्रदर्शन केल्यानंतर रिंकू सिंगने आता एकदिवसीय क्रिकेटमध्येही पदार्पण केले आहे. फिरकीपटू कुलदीप यादवने त्याला पदार्पणाची कॅप दिली.
आरोप करणं सुषमा अंधारेंच्या अंगलट; भाजप आमदाराकडून विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव
हा दुसरा सामनाही भारतीय संघाने जिंकल्यास मालिका 2-0 अशी विजयी आघाडी मिळेल. अशाप्रकारे, भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे इतिहासातील हा दुसरा मालिका विजय असेल.