शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; देवेंद्र फडणवीसांचे दिल्लीतून महत्त्वाचे ट्वीट

Devendra Fadanvis : धर्मेंद्र प्रधान यांनी देशाच्या शिक्षण क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा घडवून आणल्यात. राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) प्रभावीपणे राबविण्यात त्यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका होती.

  • Written By: Published:
Devendra Fadanvis

Devendra Fadanvis On Dharmendra Pradhan resignation : नीट पेपर फुटीवरून (NEET Paper Leak) कॉकरेच जनता पार्टीच्या ( CJP) तीव्र आंदोलनापुढे मोदी सरकार झुकले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तातडीने दिल्ली गाठली आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची जबाबदारी दिली जाईल, असा दावा शिवसेनेचे (उबाठा) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. दिल्लीत गेल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्याबाबत महत्त्वाचे ट्वीट केले आहे.

धर्मेंद्र प्रधान यांनी देशाच्या शिक्षण क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा घडवून आणल्यात. राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) प्रभावीपणे राबविण्यात त्यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका होती. पीएम श्री शाळा योजना, परदेशात आयआयटींचा विस्तार आणि प्रवेश परीक्षा 19 भाषांमध्ये उपलब्ध करून देणे यांसारख्या अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा त्यांनी केल्या, असे फडणवीस यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

समाजहित आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देत त्यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा सादर केला. वैयक्तिक हितापेक्षा राष्ट्रहिताला अधिक महत्त्व देणे, हीच एका खऱ्या भाजप कार्यकर्त्याची ओळख असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.


शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी प्रल्हाद जोशी यांच्याकडे

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी सध्या प्रल्हाद जोशी यांच्याकडं सोपवण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतींनी प्रल्हाद जोशी यांना त्यांच्या विद्यमान मंत्रालयांसोबतच शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्याचा आदेश जारी केला आहे. यानुसार प्रल्हाद जोशी त्यांच्या विद्यमान जबाबदाऱ्यांसोबतच शिक्षण मंत्रालयाचं कामकाजही पाहणार आहेत. मात्र भविष्यात नवीन शिक्षणमंत्र्याच्या नावाची घोषणा झाल्यानंतर जोशी यांना या जबाबदारीतून मुक्त केलं जाणार आहे.

follow us